19 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
19 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2021)
जानेवारीपासून सरकारच्या सर्व याचिका ‘ई-फायलिंग’द्वारेच :
- सरकारच्या वतीने उच्च न्यायालयांत सादर करण्यात येणाऱ्या सर्व याचिका वा प्रकरणे 1 जानेवारी 2022 पासून केवळ ई-फायलिंगद्वारेच सादर केली जातील अशी व्यवस्था करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीने सर्व उच्च न्यायालयांना दिले आहेत.
- तर या दिवसानंतर कुठल्याही प्रकरणात सरकारतर्फे प्रत्यक्ष प्रकरणे सादर करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे ई-कमिटीचे अध्यक्ष न्या. धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांना जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
- तसेच याव्यतिरिक्त, महसूल, कर, लवाद, वाणिज्यिक वाद यांसारख्या ठरावीक श्रेणींतील प्रकरणांसाठी 1 जानेवारीपासून ई-फायलिंग अनिवार्य करण्यात आले आहे.
- याचिका, अपिले आणि कनिष्ठ न्यायालयांचे निकाल अथवा आदेश याविरुद्धच्या फेरविचार याचिकादेखील 1 जानेवारीपासून ई-फायलिंगच्या माध्यमातून सादर कराव्या लागणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय सैनिकांना देणार त्रिशूल, वज्रसारखी पौराणिक हत्यारे :
- भारत-चीनचा गलवान खोऱ्यात संघर्ष झाला आणि यात चीनने भारतीय सैनिकांवर वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला.
- तर यात तारांचं आवरण असलेल्या काठ्यांसह अनेक वस्तूंचा समावेश होता. अशी शस्त्र वापरण्यामागचा उद्देश थेट जीवघेणी शस्त्रं न वापरता अशा संघर्षात केवळ गंभीर जखमी करण्याचा असतो.
- तसेच आता भारताने देखील चीनच्या धूर्त युद्ध रणनीतीला जशास तसं उत्तर देण्यासाठी कंबर कसलीय.
- नव्या शस्त्रास्त्र निर्मितीमुळे आता सीमेवरील भारतीय जवानांना शत्रूशी लढताना मोठी मदत होणार आहे.
- तर ही शस्त्रं इंद्राचं वज्र आणि शंकराचं त्रिशुळपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेत. त्यामुळे आधुनिक स्वरुपातीलया शस्त्रांना तिच नावं देण्यात आलीत.
स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेकडून 1 कोटीचा दंड :
- निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेसह, स्टँडर्ड चार्टर्ड बँक (स्टॅन्चार्ट) या विदेशी बँकेला दंड ठोठावला.
- स्टेट बँकेकडून 1 कोटी रुपयांचा, तर स्टॅन्चार्टकडून 1 कोटी 95 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
- आर्थिक अनियमितता व फसवणुकांचे वर्गीकरण आणि त्यांचे मध्यवर्ती बँकेला नियमित विवरण सादर करण्याच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
- तसेच नियम पालनातील कुचराईमुळे ही कारवाई करण्यात आली असून, बँकेच्या ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर त्यातून कोणताही परिणाम करण्याचा हेतू नाही, अशी स्पष्टोक्तीही मध्यवर्ती बँकेने निवेदनाद्वारे केली आहे.
आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धातपुण्याचे डॉक्टर कौस्तुभ राडकर यांनी नोंदवला विक्रम :
- पुण्याचे डॉ. कौस्तुभ राडकर यांनी आपली 29 वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
- आयर्न मॅनसाठी पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा तिन्ही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते.
- तर या स्पर्धेत 3.8 किमी पोहणे, 180.2 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे अशी स्पर्धा असते. ही स्पर्धा 17 तासात पूर्ण करायची असते.
- तसेच हे आव्हान डॉ. कौस्तुभ राडकर यांनी 13 तास 14 मिनिटं आणि 16 सेकंदात पूर्ण केलं.
- त्यामुळे त्यांना आयर्न मॅन टायटल मिळालं आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत.
- सध्याच्या घडीला ही स्पर्धा 40 हून अधिक देशात भरवली जाते. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडात या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. प्रत्येक स्पर्धेत दोन हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होतात.
दिनविशेष:
- तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन.
- खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 रोजी झाला.
- जर्मनी सन 1933 मध्ये लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
- भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान सन 1970 मध्ये हवाईदलाकडे सुपुर्द.
- पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सन 1993 मध्ये सर सी.व्ही. रामन पदक जाहीर.