2 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 जुलै 2020)
ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान:
- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉसह 59 चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली.
- या बंदीमुळे चीनला आर्थिक फटणार बसणार की नाही याबाबत बरीच चर्चा सुरू असताना, आता चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या बंदीमुळे टिकटॉकची मालकी असलेल्या ByteDance कंपनीला मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे.
- “भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्स बॅन केले आहेत.
- यामुळे टिकटॉकची मदर कंपनी असलेल्या ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Must Read (नक्की वाचा):
109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव:
- रेल्वे मंत्रालयानं बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेनं प्रस्ताव मागवले आहेत.
- संपूर्ण देशातील रेल्वेच्या जाळ्याला १२ कलस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे.
- या 12 क्लस्टरमध्ये 109 जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत.
- प्रत्येक रेल्वे कमीतकमी 16 डब्ब्यांची असेल. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास असेल.
- या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल. तसंच देखरेखीचा खर्चही संबंधित कंपनी करेल. रेल्वे केवळ गार्ड आणि मोटरमन पुरवणार आहे.
- या कामासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट 30 हजार कोटी रुपये ठेवलं गेलं आहे.
गुगल प्ले स्टोअरवरून 72 तासांत चिंगारीचे 5 लाख डाऊनलोड:
- भारतात सरकारच्या आदेशानंतर टिकटॉक हे चिनी उपयोजन (अॅप) बंद होताच त्याची जागा ‘चिंगारी’ या उपयोजनाने घेतली आहे. त्याचे प्लेस्टोअरवरून 1 कोटीहून अधिक डाऊनलोड झाले आहेत.
- भारतातील त्याचे प्रतिस्पर्धी उपयोजन असलेल्या ‘चिंगारी’ व ‘मित्रों’ उपयोजनांची सरशी झाली आहे.
- चिंगारी अॅपचे तासाला 1 लाख डाउनलोड झाले आहेत.
- चिंगारीच्या मुख्य उत्पादन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चिंगारीचे तासाला 1 लाख डाऊनलोड होत आहेत. आता आम्ही सव्र्हरची क्षमता वाढवत आहोत व ही मागणी पूर्ण करणार आहोत.
- गुगल प्ले स्टोअरवरून 72 तासांत चिंगारीचे 5 लाख डाऊनलोड झाले.
जागतिक बँकेने भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले:
- भारतातील 15 कोटी सुयोग्य लघु व मध्यम उद्योगांसाठी 75 कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय मदत देणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
- 2020 या आर्थिक वर्षांत ( जुलै 2019 ते जून 2020) जागतिक बँकेने भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते.
- कोविड 19 साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यातील 2.75 अब्ज डॉलर्सचे कर्ज लगेच मंजूर करण्यात आले होते.
मनोहर यांनी नोव्हेंबर 2015 पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले:
- शशांक मनोहर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाले.
- मनोहर यांनी नोव्हेंबर 2015 पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले.
- हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
- मनोहर यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत,’’ असे साहनी यांनी सांगितले. ख्वाजा यांनीही मनोहर यांच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुकोद्गार काढले.
बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येणार:
- भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालायनं बुधवारी रद्द केल्या. या प्रक्रियेत चिनी कंपन्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
- त्यामुळे या अपग्रेडेशनसाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- येत्या दोन महिन्यांत बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी सहा जणांची समिती देखील नेमण्यात येणार आहे.
- 4G अपग्रेडेशनसाठी चिनी साधनं वापरु नका. साधाराण 7000 ते 8000 कोटींचे हे कंत्राट असणार आहे.
दिनविशेष :
- 2 जुलै हा दिवस जागतिक युएफओ (UFO) दिन म्हणून पाळला जातो.
- सन 1865 मध्ये साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे 2 जुलै 1940 मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.
- पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सन 1972 मध्ये सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
- सन 2001 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104 फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.