2 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 एप्रिल 2019)
राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यामध्ये:
- पुणे जिल्ह्य़ातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चारही लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांची संख्या 75 लाख 16 हजार 880 झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात आहेत.
- शहरासह जिल्ह्य़ातील एकूण मतदान केंद्रांची संख्या सात हजार 666 एवढी झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पुरवणी यादी जाहीर होणार आहे. पुरवणी यादीत नाव असलेल्या मतदारांना लोकसभा निवडणुकीकरिता मतदान करता येणार आहे.
- 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक शाखेकडून सातत्याने खास मतदार नोंदणी मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. तसेच शहरासह जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी खास मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते.
- तर त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी करणे, मतदारांचे नाव, पत्ता यांची दुरुस्ती करणे, दुबार नावे वगळणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत तब्बल एक लाख 47 हजार 739 अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
बँक ऑफ बडोदा ठरली दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक:
- 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू झाले आहे. यामुळे भारतातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे.
- तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018च्या अखेरीस दिलेल्या तत्वत: मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.
- भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 मार्च 2019ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत.
- तसेच विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.
माहिती आयोगावर अंकुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न:
- सरकारी अधिकारी तसेच प्रशासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या माहिती आयोगाच्याच नाडय़ा आवळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला आहे.
- मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांविरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच समिती स्थापून या आयोगावर अंकुश राखण्याच्या या प्रयत्नांना आयोगाकडून तीव्र विरोध होत आहे.
- माहिती आयुक्तांच्या चौकशीसाठी अशी समिती नेमण्याचा प्रयत्न हा माहिती अधिकाराच्या कायद्याच्या मूळ हेतूलाच छेद देणारा आहे, अशी टीका सुरू आहे. या प्रस्तावाबद्दल गेल्याच महिन्यात सरकारने माहिती आयुक्तांचे मत मागवले होते. आता लोकसभा निवडणुकीमुळे हा प्रस्ताव अंमलात येण्याचा मार्ग रोखला गेला असला तरी सरकारच्या या प्रयत्नांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- मुख्य माहिती आयुक्तांविरोधात तक्रारी आल्या तर त्याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षणविषयक सचिव आणि निवृत्त मुख्य माहिती आयुक्त यांची समिती काम करील. निवडणूक आयुक्तांच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील समन्वय सचिव, केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षणविषयक सचिव आणि निवृत्त माहिती आयुक्त यांची समिती असेल.
- तसेच याचा अर्थ सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार रोखणाऱ्या माहिती आयोगाचे भवितव्य बहुसंख्य सरकारी अधिकाऱ्यांचाच समावेश असलेल्या समितीकडे राहील आणि हे गैर असल्याचा सूर निघत आहे.
पुण्यात विनोदातील ‘राजा’चे होणार स्मारक:
- निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील राजा ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही राजा गोसावी नावाची जादू ओसरलेली नाही.
- आयुष्यभर प्रेक्षकांच्या चेह-यावर हसू उमटविणा-या या विनोदवीराच्या स्मृती आता कायमस्वरूपी जतन केल्या जाणार आहेत. कै. राजा गोसावी प्रतिष्ठानने राजा गोसावी यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
- सौजन्याची ऐशीतैशी, करायला गेलो एक, लग्नाची बेडी, डार्लिंग डार्लिंग यांसारख्या विविध व्यावसायिक नाटकांसह ह्णएकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळह यांसारखी संगीत नाटके तसेच अवघाची संसार, आंधळा मागतो एक डोळा, लाखाची गोष्ट, हा खेळ सावल्यांचा अशा अनेक चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अभिनयाचे दर्शन घडविले.
- तसेच आजही त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी होतात. इतकी लोकप्रियता लाभलेल्या या प्रतिभावंत कलावंताचे स्मारक साता-यापासून दहा किलोमीटरवर असलेल्या लिंब या गावी करण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतला आहे.
- लिंब मधील गौरीशंकर कॉलेजच्या मागची जागा प्रतिष्ठानने शासनाकडे मागितली. यास शासनाने हिरवा कंदिल दिल्याची माहिती कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश गोसावी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.
आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदावर ‘मनू साहनी’:
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी म्हणून माध्यम व्यावसायिक मनू साहनी यांनी पदभार स्वीकारला. विद्यमान कार्यकारी डेव्ह रिचर्डसन हे त्यांच्यासमवेत जुलैतील विश्वचषकाच्या समारोपापर्यंत कार्यरत राहणार असून त्यानंतर ते निवृत्ती स्वीकारणार आहेत.
- ईएसपीएन स्टार स्पोर्ट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज केलेले साहनी हे या कालावधीच्या अंतिम सहा आठवडय़ांमध्ये रिचर्डसन यांच्यासमवेत कामकाज करून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याबाबत दक्षता घेणार आहेत.
- साहनी यांची नियुक्ती जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी रिचर्डसन जुलैपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. आयसीसीच्या वतीने शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साहनी यांची निवड केली होती.
आशियाई स्पर्धेत भारतीय नेमबाजांची सुवर्ण कमाई:
- भारतीय नेमबाजांनी आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीदेखील पाच पदकांची कमाई करीत स्पर्धेवरील वर्चस्व कायम राखले.
- या स्पर्धेत भारताने 16 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. स्पर्धेत भारताने 16 सुवर्णसह 5 रौप्य आणि 4 कांस्यपदके अशी 25 पदके मिळवली आहेत.
- स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी यशवर्धन आणि श्रेया अग्रवाल यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. यशने 10 मीटर एअर रायफलच्या कनिष्ठ पुरुष गटात तसेच सांघिक गटात केवल प्रजापती आणि ऐश्वर्य तोमरसह सुवर्णपदक मिळवले.
- तसेच कनिष्ठ रायफल मिश्र सांघिक गटात यशवर्धनने श्रेयासह सुवर्णपदकावर नाव कोरत तीन सुवर्ण मिळवले. तर श्रेयाने दुसरे सुवर्ण 10 मीटर एअर रायफल कनिष्ठ महिला गटात मिळवले.
- तर महिलांच्या सांघिक गटात मेहुली घोष आणि कवी चक्रवर्ती यांच्याबरोबर तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीमुळे भारतीय नेमबाजांमध्ये चांगला आत्मविश्वास निर्माण झाला असून संयुक्त अरब अमिरातमध्ये 5 एप्रिलपासून होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भारताला भविष्यात अधिक पदकेदेखील मिळू शकतील.
दिनविशेष:
- 2 एप्रिल हा दिवस ‘जागतिक आत्मकेंद्रिपणा जागरूकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सन 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
- 1894 यावर्षी छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
- भारतीय कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी झाला होता.
- 2 एप्रिल 2011 रोजी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने 28 वर्षांनंतर विजय मिळवला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Verynice app