2 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 एप्रिल 2020)
मिसाइलच्या कारखान्यात इस्रायलने सुरु केली व्हेंटिलेटर्सची निर्मिती :
- करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे.
- इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यामध्ये पहिल्या 30 व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
- इस्रायलमध्ये वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या Inovytec ने हे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. दर आठवडयाला शंभर व्हेंटिलेटर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या या कारखान्यात अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘अॅरो’ मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सॅटलाइटची निर्मिती केली जाते.
- तर मागच्यावर्षी इस्रायलने सुद्धा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मानवरहीत यानाची निर्मिती सुद्धा इथेच करण्यात आली होती.
11वीसाठी अप्लाईड मॅथेमॅटिक्स विषय :
- सीबीएसईने 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा विषय अप्लाईड मॅथेमॅटिक्स सुरू केला. मंडळाने हा पुढाकार मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या आदेशावरून घेतला.
- सीबीएसईच्या वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
- तर या वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाला दोन पर्याय दिले होते. विद्यार्थ्याने एक तर बेसिक गणिताचा विषय निवडावा किंवा स्टँडर्ड गणित. याचा उद्देश असा की जे विद्यार्थी गणितात कच्चे आहेत त्यांना बेसिक
गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण करावे. परंतु, त्यांना अकरावीत गणित विषय म्हणून मिळणार नाही. - पहिल्यांदा बोर्डाकडून हा पर्याय दिला गेला आहे की, दहावीची बेसिक गणिताची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्याने पुढील दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षेत स्टँडर्ड गणिताची परीक्षा द्यावी व उत्तीर्ण झाल्यावर 11वीत गणित विषय तो घेऊ
शकेल.
जागतिक कुस्ती क्रमवारीत बजरंगची दुसऱ्या स्थानी झेप :
- भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया याने नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
- मात्र रँकिंग गुण मिळवणाऱ्या स्पर्धामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला तरी पुढील वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत बजरंग 65 किलो वजनी गटात चौथ्या क्रमांकावर असेल, याची खात्री त्याला वाटत आहे.
- पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल चार जणांसह स्थान मिळवू, असा विश्वास उभरता कुस्तीपटू रवी दहिया यालाही वाटत आहे. दहिया सध्या 57 किलो गटात चौथ्या स्थानी आहे.
- तर रशियाचा ऑलिम्पिक विजेता गाझीमुराद राशीदोव्ह सध्या 65 किलो गटात चार गुणांच्या फरकाने अव्वल स्थानी आहे. मात्र बजरंग आणि राशीदोव्ह यांनी या गटात आपले स्थान भक्कम के ले आहे. प्रत्येक गटातील अव्वल चार
जणांना 2021 ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.
करोना रुग्णांची काळजी घेताना मृत्यू झाल्यास 1 कोटी देणार :
- करोना व्हायरसच्या रुग्णावर उपचार करताना, त्यांची काळजी घेताना कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीआहे. हा त्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या सेवेचा आदर असेल असे केजरीवाल म्हणाले.
- तर करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, तंत्रज्ञ आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे आरोग्य विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केले होते.
- त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज ही घोषणा केली.
दिनविशेष:
- 2 एप्रिल हा दिवस ‘जागतिक आत्मकेंद्रिपणा जागरूकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सन 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
- 1894 यावर्षी छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
- भारतीय कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी झाला होता.
- 2 एप्रिल 2011 रोजी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने 28 वर्षांनंतर विजय मिळवला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Thanks
Very nice information