वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच सुवर्णयश संपादन करण्याची दमदार कामगिरी केली.
त्याने 73 किलो वजनी गटात भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुलमधील तिसरे सुवर्ण, वेटलिफ्टिंगमधील एकूण सहावे पदक मिळवले.
तसेच त्याने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना स्नॅचमध्ये 143 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 170 किलो असे एकूण 313 किलो वजन उचलत सुवर्ण कामगिरी केली.
कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अचिंताने स्नॅचमधील आपल्या तीन प्रयत्नांत अनुक्रमे 137 किलो, 140 किलो आणि 143 किलो वजन उचलले.
तसेच क्लीन अँड जर्कमध्ये कोलकाताच्या अचिंताने 166 किलो वजनाने सुरुवात केली.
भारतीय वेटलिफ्टिंगपटूं हरजिंदर कौरला कांस्य पदक :
बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे.
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय महिला वेटलिफ्टिंगपटू हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
कौरने एकूण 212 किलो वजन उचलून इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अॅलेक्सिस अॅशवर्थला मागे टाकत थरारक स्पर्धेत कांस्यपदकावर कब्जा केला.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई झाली होती.
मीराबाई चानूने सुवर्ण, महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्य, गुरुराजा पुजारी कांस्य आणि बिंद्याराणी देवीने रौप्यपदकाची कमाई केली होती.
भारतीय ज्युदोपटूं सुशीला देवीला रौप्य तर विजय कुमार यादवला कांस्य पदक :
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय ज्युदोपटूंची कमाल केली आहे.
महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली.
सुशीला देवी लिकमाबामला 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हाईटबोईकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
विजय कुमार यादवने पुरुषांच्या ज्युदोमध्ये सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
टोकियो ऑलिंपिकमध्ये ज्युदो क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणारी सुशीला ही एकमेव खेळाडू होती.
हरमनप्रीतने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम :
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी 20 सामना खेळवण्यात आला.
तर या शिवाय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठीदेखील हा सामना विशेष ठरला.
पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून तिने पुरुष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय टी २० संघाचा कर्णधार म्हणून धोनीने 72 सामने खेळले आहेत. त्यापैकी 41 सामन्यांमध्ये त्याला विजय मिळवता आला.
तिने टी 20 संघाचा कर्णधार म्हणून 71 सामने खेळले आहेत आणि 42 मध्ये विजय मिळवला आहे.
दिनविशेष :
सन 1870 मध्ये जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
आध्यात्मिक गुरू ‘जे.पी. वासवानी’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1954 मध्ये दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
सन 2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.