2 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 फेब्रुवरी 2020)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला 17 वर्षांपूर्वीचा विक्रम :
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर एकीकडे विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे हा अर्थसंकल्प काही वेगळ्या कारणांमुळे विशेष देखील ठरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या अर्थसंकल्पाद्वारे 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
- अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेच्यानुसार सर्वात प्रदीर्घ असे भाषण केले आहे. त्यांचे भाषण 2 तास 40 मिनिटं चालले.
- तर या अगोदर माजी अर्थमंत्री जसवंतसिंह यांच्या नावावर सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांनी 2 तास 13 मिनिटं भाषण केले होते.
- तसेच त्यांच्या खालोखाल दिवगंत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा क्रमांक येतो. त्यांनी 2 तास 10 मिनिटं भाषण केले होते. तर, 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी 2 तास 5 मिनिटं भाषण केलेलं आहे.
- याशिवाय निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री देखील ठरल्या आहेत. या अगोदर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील दोनवेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाशिवाय अन्य खात्यांची देखील अतिरिक्त जबाबदारी होती.
Must Read (नक्की वाचा):
रेल्वे रुळांलगत सौरऊर्जा प्रकल्प :
- रेल्वेसाठी अर्थसंकल्पात सत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भांडवली खर्चासाठी 1.61 लाख कोटी इतकी रक्कम निर्धारित करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ती केवळ तीन टक्के अधिक आहे.
- चार रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, तसेच 150 रेल्वे गाडय़ांचे संचालन सार्वजनिक-खासगी भागीदारीतून केले जाणार आहे. तसेच रुळालगत रेल्वेच्या मालकीच्या जागेवर मोठय़ा प्रमाणात वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
- तसेच महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या जोडणाऱ्या तेजस प्रकारच्या नव्या गाडय़ा सुरू केल्या जाणार आहेत. मेट्रोच्या धर्तीवर भाडी असलेल्या 148 किमीच्या प्रस्तावित बंगळूरु उपनगरी वाहतूक प्रकल्पासाठी 18 हजार 600 कोटींची तरतूद आहे.
- तर त्यात 20 टक्के वाटा केंद्राचा असेल, तर प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के रक्कम बाहेरून उभी केली जाईल. शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी ‘कृषी रेल’ सुरू करण्यात येणार आहे. सार्वजनिक व सरकारी भागीदारीतून हा प्रकल्प असेल. प्रवासी गाडय़ा आणि मालगाडय़ांतही शीतकरणाची सोय असलेले डबे असतील.
दिनविशेष:
- 2 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ भूमी दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
- स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1856 मध्ये झाला होता.
- केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1923 रोजी झाला होता.
- गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची सन 1957 मध्ये गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता झाली होती.
- सन 1962 मध्ये 400 वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
- इराणमधील रामसर येथे सन 1971 मध्ये पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा