2 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs
2 January 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 जानेवारी 2021)
Pfizer-BioNTech लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी :
- जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे.
- तर या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
- ब्रिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.
- करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):
जपान तयार करतोय जगातील पहिलं ‘लाकडी सॅटलाइट :
- अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या 5 लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत.
- तर यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.
- तसेच 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.
- तर येत्या काळात ‘लाकडी सॅटलाइट’ तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे.
- जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे.
- तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे.
- तसेच यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे.
- लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.
एच 1बी व्हिसा, ग्रीनकार्डवरील बंदीला ट्रम्प यांनी दिली मुदतवाढ :
- भारतामधील आयटी तंत्रज्ञांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एच1बी व्हिसा आणि ग्रीनकार्ड यावरील बंदी 31 मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी करून भारतीयांना जाता जाता आणखी एक दणका दिला आहे.
- नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अधिकारावर आल्यानंतर यामध्ये काही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
- तसेच अद्यापही अमेरिकेमध्ये कोरोनाचे संक्रमण सुरूच असून, परिस्थितीमध्ये फारसा बदल न झाल्यामुळे हे प्रतिबंध येत्या 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
भारत-ब्रिटन विमानसेवा सुरु होणार 8 जानेवारीपासून :
- भारत आणि ब्रिटनमधील विमानांच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे.
- तर 8 जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना संमती देण्यातली आहे.
- करोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळल्याने 23 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत भारत ते ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना स्थगिती देण्यात आली होती.
- दरम्यान 8 ते 23 जानेवारी दरम्यान मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादसाठी आठवड्याला फक्त 15 उड्डाणांना संमती देण्यात आल्याचंही पुरी यांनी सांगितलं.
दिनविशेष:
- सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
- सन 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
- मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.
- राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.
- सन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.