2 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 जुलै 2020)
ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान:
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉसह 59 चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली.
या बंदीमुळे चीनला आर्थिक फटणार बसणार की नाही याबाबत बरीच चर्चा सुरू असताना, आता चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या बंदीमुळे टिकटॉकची मालकी असलेल्या ByteDance कंपनीला मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे.
“भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्स बॅन केले आहेत.
यामुळे टिकटॉकची मदर कंपनी असलेल्या ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव:
रेल्वे मंत्रालयानं बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेनं प्रस्ताव मागवले आहेत.
संपूर्ण देशातील रेल्वेच्या जाळ्याला १२ कलस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे.
या 12 क्लस्टरमध्ये 109 जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत.
प्रत्येक रेल्वे कमीतकमी 16 डब्ब्यांची असेल. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास असेल.
या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल. तसंच देखरेखीचा खर्चही संबंधित कंपनी करेल. रेल्वे केवळ गार्ड आणि मोटरमन पुरवणार आहे.
या कामासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट 30 हजार कोटी रुपये ठेवलं गेलं आहे.
गुगल प्ले स्टोअरवरून 72 तासांत चिंगारीचे 5 लाख डाऊनलोड:
भारतात सरकारच्या आदेशानंतर टिकटॉक हे चिनी उपयोजन (अॅप) बंद होताच त्याची जागा ‘चिंगारी’ या उपयोजनाने घेतली आहे. त्याचे प्लेस्टोअरवरून 1 कोटीहून अधिक डाऊनलोड झाले आहेत.
भारतातील त्याचे प्रतिस्पर्धी उपयोजन असलेल्या ‘चिंगारी’ व ‘मित्रों’ उपयोजनांची सरशी झाली आहे.
चिंगारी अॅपचे तासाला 1 लाख डाउनलोड झाले आहेत.
चिंगारीच्या मुख्य उत्पादन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चिंगारीचे तासाला 1 लाख डाऊनलोड होत आहेत. आता आम्ही सव्र्हरची क्षमता वाढवत आहोत व ही मागणी पूर्ण करणार आहोत.
गुगल प्ले स्टोअरवरून 72 तासांत चिंगारीचे 5 लाख डाऊनलोड झाले.
जागतिक बँकेने भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले:
भारतातील 15 कोटी सुयोग्य लघु व मध्यम उद्योगांसाठी 75 कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय मदत देणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
2020 या आर्थिक वर्षांत ( जुलै 2019 ते जून 2020) जागतिक बँकेने भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते.
कोविड 19 साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यातील 2.75 अब्ज डॉलर्सचे कर्ज लगेच मंजूर करण्यात आले होते.
मनोहर यांनी नोव्हेंबर 2015 पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले:
शशांक मनोहर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाले.
मनोहर यांनी नोव्हेंबर 2015 पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले.
हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
मनोहर यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत,’’ असे साहनी यांनी सांगितले. ख्वाजा यांनीही मनोहर यांच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुकोद्गार काढले.
भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालायनं बुधवारी रद्द केल्या. या प्रक्रियेत चिनी कंपन्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे या अपग्रेडेशनसाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या दोन महिन्यांत बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी सहा जणांची समिती देखील नेमण्यात येणार आहे.
4G अपग्रेडेशनसाठी चिनी साधनं वापरु नका. साधाराण 7000 ते 8000 कोटींचे हे कंत्राट असणार आहे.
दिनविशेष :
2 जुलै हा दिवस जागतिक युएफओ (UFO) दिन म्हणून पाळला जातो.
सन 1865 मध्ये साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे 2 जुलै 1940 मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सन 1972 मध्ये सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
सन 2001 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.