2 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 मार्च 2023)
डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या औषधांच्या दरांची केली निश्चिती:
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) या विभागाने मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या 74 औषधांचे दर निश्चित केले आहेत.
या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या आधारे ऑर्डर 2013 अंतर्गत किरकोळ औषधांच्या किंमती निश्चित केल्या गेल्या.
National Pharmaceutical Pricing Authority म्हणजेच NPPA या विभागाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहावे यासाठी घेतल्या जाणाऱ्या Dapagliflozin, Sitagliptin आणि मधुमेहावरील Metformin Hydrochloride यांच्या एका टॅब्लेटची किंमत 27.75 रुपये असेल अशी घोषणा करण्यात आली.
तसेच उच्च रक्तदाबावर उपयुक्त असलेल्या Telmisartan, Bisoprolol Fumarate या औषधांची किंमतही कमी करण्यात आली आहे.
प्राधिकरण विभागाने 80 अधिसूचित केलेल्या औषधांच्या दरांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्युट्रोपेनिया आणि एपिलेप्सी अशा आजारांवर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ, महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मिळण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो.
मार्च 2023 मध्ये यामध्ये सुधारणा केल्याने होळीनंतर सरकारद्वारे या संबंधित अधिकृत घोषणा होऊ शकते असे म्हटले जात आहे.
8 मार्च पर्यंत महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमझ्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे.
सध्या कॉमन फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के इतका आहे.
5G च्या लॉन्चिंगनंतर भारताचा Download Speed पोहोचला 115 टक्क्यांवर:
देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5 जी सर्व्हिस सुरु केली आहे.
देशाच्या अनेक शहरांमध्ये 5जी नेटवर्क सुरु झाले आहे.
सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात 5 जी सर्व्हिस अत्यंत वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे.
स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताची स्थिती मजबूत होताना दिसत आहे.
जानेवारी 2023 मध्ये भारत हा 69 व्या स्थानावर होता परंतु भारतात 5जी च्या वेगामुळे भारत 49 व्या स्थानावर पोहोचला आहे.
या आकडेवारीवरून भारत आता रशिया आणि अर्जेटिना सारख्या G20 राष्ट्रांच्याही पुढे गेला आहे.
तिहेरी उडीपटू ऐश्वर्यावर चार वर्षांची बंदी:
भारताची आघाडीची तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबूवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीने चार वर्षांची बंदी घातली आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या चाचणीत ऐश्वर्याने ‘ओस्टारीन’ या बंदी घातलेल्या उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते.
ऐश्वर्याला 13 फेब्रवारी रोजी ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीकडून बंदीचे पत्र मिळाले होते.
ऐश्वर्या गेल्या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार होती, परंतु जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) बंदी घातलेले उत्तेजक द्रव्य शरीरात आढळल्याने ऐश्वर्या आणि धावपटू एस. धनलक्ष्मी यांना राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय चमूतून वगळण्यात आले होते.
अश्विन अण्णा ठरला टेस्टमध्ये नंबर 1 गोलंदाज:
भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.
त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत नंबर-1 कसोटी अव्वलस्थान पटकावला आहे.
आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली होती, ज्याचा त्याला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
आर अश्विन 2015 मध्ये प्रथमच नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आणि त्यानंतर तो या खुर्चीवर अनेकदा बसला आहे.
त्याचवेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका स्थानाच्या फायदा घेऊन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अशाप्रकारे ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत तीन भारतीय गोलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन:
फ्रान्सचे माजी दिग्गज फुटबॉलपटू, 1958च्या विश्वचषक स्पर्धेत विक्रमी 13 गोल झळकावणारे जस्ट फॉन्टेन यांचे बुधवारी निधन झाले.
स्वीडन येथे झालेल्या 1958 सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी फॉन्टेन यांचा अखेरच्या क्षणी फ्रान्सच्या संघात समावेश करण्यात आला होता.
मात्र, या स्पर्धेच्या सहा सामन्यांत त्यांनी 13 गोल झळकावले आणि एका विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला.
दिनविशेष:
सन 1857 मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सन 1903 मध्ये सुरु झाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सन 1952 या वर्षी सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले होते.
सन 1969 मध्ये जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले होते.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.