2 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
2 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2021)
सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची भारताची मुदत संपुष्टात:
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी भारताची एक महिन्याची मुदत संपुष्टात आली असून जागतिक पातळीवर भारताने या काळात चांगला ठसा उमटवला आहे.
- तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर तेथे दहशतवाद्यांना आश्रय देण्यात येऊ नये, असा इशारा देणारा ठराव भारताच्या पुढाकाराने संमत करण्यात आला.
- भारताची सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची कारकीर्द संपली असली तरी अजून भारत संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य म्हणून दोन वर्षे काम करणार आहे.
- तसेच सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद सतत फिरते राहते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे हे अध्यक्षपद ऑगस्टमध्ये भारताकडे होते.
- तर भारताने ठराव क्रमांक 1267 मांडला होता. तो भारतासाठी महत्त्वाचा ठरला होता.
Must Read (नक्की वाचा):
‘कोलेस्टेरॉल’चे प्रमाण कमी करणारे इंजेक्शन लवकरच उपलब्ध :
- कोलेस्टेरॉल कमी करणारे नवे इंजेक्शन ब्रिटन देशभरातील हृदयविकार रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले आहे.
- तसेच हे औषधरूपातील इंजेक्शन वर्षातून दोनदा घेतल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहणार आहे.
- ‘इनक्लिसिरान’ असे या औषधाचे नाव असून कोलेस्टेरॉल विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासाठी त्याची मदत होणार आहे.
- तर त्यासाठी स्वित्झर्लंडच्या नोवार्तिस कंपनीशी केलेला करार हा जगातील अत्यंत महत्त्वाचा करार असून त्यामुळे हृदयविकाराविरोधातील प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळणार आहे.
‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन :
- क्रिकेट विश्वातील दिग्गज, समालोचक आणि टीम इंडियाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
- तर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लंडनमध्ये पार पडला.
- तसेच यावेळी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या प्रशिक्षकाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला.
रोहित शर्मा टॉप 5 मध्ये :
- भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत चढउतार दिसून येत आहेत.
- तसेच चांगल्या फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
- तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. टॉप 5 फलंदाजांच्या क्रमवारीतून मागे पडला आहे.
- रोहित शर्माला टॉप 5 फलंदाजांमध्ये स्थान मिळालं आहे.
- तसेच पाच वर्षात पहिल्यांदाच कर्णधार विराट कोहली टॉप 5 मधून बाहेर गेला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये उभारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी :
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे.
- तर उर्वरित 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल.
- तसेच केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी 191 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दिनविशेष :
- 2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन 2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.
- व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून 2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.
- 2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
- केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.