2 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2021)
सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची भारताची मुदत संपुष्टात:
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी भारताची एक महिन्याची मुदत संपुष्टात आली असून जागतिक पातळीवर भारताने या काळात चांगला ठसा उमटवला आहे.
तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर तेथे दहशतवाद्यांना आश्रय देण्यात येऊ नये, असा इशारा देणारा ठराव भारताच्या पुढाकाराने संमत करण्यात आला.
भारताची सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची कारकीर्द संपली असली तरी अजून भारत संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य म्हणून दोन वर्षे काम करणार आहे.
तसेच सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद सतत फिरते राहते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे हे अध्यक्षपद ऑगस्टमध्ये भारताकडे होते.
तर भारताने ठराव क्रमांक 1267 मांडला होता. तो भारतासाठी महत्त्वाचा ठरला होता.
‘कोलेस्टेरॉल’चे प्रमाण कमी करणारे इंजेक्शन लवकरच उपलब्ध :
कोलेस्टेरॉल कमी करणारे नवे इंजेक्शन ब्रिटन देशभरातील हृदयविकार रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले आहे.
तसेच हे औषधरूपातील इंजेक्शन वर्षातून दोनदा घेतल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहणार आहे.
‘इनक्लिसिरान’ असे या औषधाचे नाव असून कोलेस्टेरॉल विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासाठी त्याची मदत होणार आहे.
तर त्यासाठी स्वित्झर्लंडच्या नोवार्तिस कंपनीशी केलेला करार हा जगातील अत्यंत महत्त्वाचा करार असून त्यामुळे हृदयविकाराविरोधातील प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळणार आहे.
‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन :
क्रिकेट विश्वातील दिग्गज, समालोचक आणि टीम इंडियाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
तर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लंडनमध्ये पार पडला.
तसेच यावेळी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या प्रशिक्षकाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला.
रोहित शर्मा टॉप 5 मध्ये :
भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत चढउतार दिसून येत आहेत.
तसेच चांगल्या फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. टॉप 5 फलंदाजांच्या क्रमवारीतून मागे पडला आहे.
रोहित शर्माला टॉप 5 फलंदाजांमध्ये स्थान मिळालं आहे.
तसेच पाच वर्षात पहिल्यांदाच कर्णधार विराट कोहली टॉप 5 मधून बाहेर गेला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये उभारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे.
तर उर्वरित 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल.
तसेच केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी 191 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दिनविशेष :
2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन 2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.
व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.
2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.