20 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 डिसेंबर 2022)
जागतिक जैवविविधता करारास मंजुरी:
- चार वर्षांच्या भरीव वाटाघाटीनंतर भारतासह सुमारे 200 देशांनी जागतिक जैवविविधता संरक्षण व नुकसानभरपाई संबधिचा महत्त्वाचा ऐतिहासिक करार मंजूर केला.
- संयुक्त राष्ट्रांच्या 15 व्या ‘कॉर्पोरेशन ऑफ पार्टीज’ (यूएन कॉप 15) या जैवविविधता शिखर परिषदेतील वाटाघाटींच्या सर्वंकष विचारमंथनानंतर सोमवारी पहाटे अंतिम सत्रात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- चीनच्या अध्यक्षतेखाली झालेला हा करार भूप्रदेश, व सागरी क्षेत्रातील विविध प्रजातींना प्रदूषण, ऱ्हास आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून उद्देशाने करण्यात आला आहे.
- शिखर परिषदेचे अध्यक्ष व चीनचे पर्यावरण मंत्री हुआंग रुनक्यु यांनी ‘कुनिमग-मॉन्ट्रियल करार’ स्वीकारल्याचे घोषित केले.
- ‘कॉप 15’चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या चीनने यापूर्वी 2030 पर्यंत जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 30 टक्के भूप्रदेश व सागरी क्षेत्राचे संरक्षण-संवर्धन करण्याचे आवाहन करणारा मसुदा प्रसिद्ध केला होता.
- सध्या 17 टक्के भूप्रदेश व 10 टक्के सागरी क्षेत्र संरक्षित करण्याची तरतूद होती.
राज्यभरात राबविले जाणार ‘स्वच्छ मौखिक आरोग्य अभियान’:
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या मौखिक आरोग्यावर काम करण्याचा संकल्प केला आहे.
- तंबाखू आदी सेवनामुळे तोंडाच्या होणाऱ्या कर्करोगापासून मौखिक आजारांच्या विविध प्रकारांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात हे लक्षात घेऊन उपमुख्यंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील 36 जिल्ह्यात ‘स्वच्छ मौखिक आरोग्य अभियान’ राबविण्यात येणार आहे.
- 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या मौखिक आरोग्यावर काम करण्याच्या सूचना आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या होत्या.
- अनेक मोठे आजार होण्यामागे मौखिक आरोग्याची योग्य जपणूक न करणे हे महत्त्वाचे कारण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मौखिक आरोग्याचे अभियान राबविण्याची त्यांची योजना होती.
- त्यानुसार येत्या प्रजासत्ताकदिनापासून म्हणजे 26 जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘स्वच्छ मुख अभियान’ राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
बेन्झिमाची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती :
- फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराचा यंदाचा मानकरी फ्रान्सचा आघाडीपटू करीम बेन्झिमाने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
- दुखापतीमुळे बेन्झिमा या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नाही.
- 35 वर्षीय बेन्झिमाने 97 सामन्यांत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्याने 37 गोल नोंदवले.
- रेयाल माद्रिदकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या बेन्झिमाने 28 मार्च 2007 मध्ये ऑस्ट्रियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते.
- त्यानंतर 2008च्या युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत बेन्झिमाने फेरो द्वीपसमूहाविरुद्ध फ्रान्ससाठी कारकीर्दीतील पहिला गोल केला.
गोल्डन बॉल मेस्सीकडे, तर गोल्डन बूट किलियन एमबाप्पेकडे :
- फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत ट्रॉफी जिंकली.
- एमबाप्पे या स्पर्धेतील सर्वाधिक आठ गोल करणारा खेळाडू होता.
- अंतिम फेरीनंतर स्पर्धेतील काही उत्कृष्ट कामगिरीसाठी बक्षिसे देण्यात आली.
- यामध्ये वर्ल्ड कप गोल्डन बूट, वर्ल्ड कप गोल्डन ग्लोव्ह, फिफा यंग प्लेयर अवॉर्ड आणि फिफा फेअर प्ले अवॉर्ड यांचा समावेश आहे.
- स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट दिला जातो.
- स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा गोल्डन बॉल ही व्यक्तिनिष्ठ निवड प्रक्रिया आहे. फिफाची तांत्रिक टीम काही खेळाडूंची निवड करते आणि जगभरातील विविध माध्यम संस्थांच्या प्रतिनिधींच्या मतांच्या आधारे विजेत्याची निवड केली जाते.
- विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकासाठी गोल्डन ग्लोव्ह प्रथम 1994 च्या आवृत्तीत यूएसए मध्ये देण्यात आला.
दीपिका पदुकोणने फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी ठरली पहिली भारतीय :
- अभिनेत्री दीपिका पदुकोणने खचाखच भरलेल्या लुसेल स्टेडियममध्ये ‘फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी’चे अनावरण केले.
- दीपिका पदुकोण फिफा ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय ठरली.
- सुपरस्टार आणि भारताच्या सर्वात मोठ्या जागतिक राजदूताने फिफा विश्वचषक ट्रॉफी खास सुरू केलेल्या ट्रकमध्ये नेली आणि लुसेल स्टेडियममध्ये त्याचे अनावरण केले.
- विशेष म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेचा भाग नसतानाही भारताला इतका मोठा मान मिळाला.
- दीपिका पदुकोणने अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील सामन्यापूर्वी माजी स्पॅनिश गोलकीपर इकर कॅसिलाससह फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण केले.
- प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, जिथे ती ज्युरी सदस्य बनली आणि ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’ नुसार जगातील टॉप 10 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत एकमेव भारतीय आहे.
- दीपिका पदुकोण लक्झरी ब्रँड आणि अगदी पॉप कल्चर ब्रँडसाठी जागतिक चेहरा म्हणून निवडलेली दीपिका पदुकोण ही एकमेव भारतीय आहे.
दिनविशेष:
- 20 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका ‘यामिनी कृष्णमूर्ती‘ यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 रोजी झाला.
- सन 1945 मध्ये मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
- सन 1999 मध्ये पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.