20 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 July 2019 Current Affairs In Marathi

20 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 जुलै 2019)

रणगाडाभेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण :

  • भारतीय सेनेने राजस्थानातील पोखरण फायरींग रेंजवर स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील एंटी – टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) ‘नाग’ चे परीक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले.
  • तर हे परीक्षण 7 ते 18 जुलै दरम्यान करण्यात आले. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.
  • तसेच या क्षेपणास्त्राची निर्मितीचे कार्य या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल. आतापर्यंत याची चाचणी सुरू होती. 2018 मध्ये या क्षेपणास्त्राची हिवाळी चाचणी घेण्यात आली होती.
  • भारतीय सेना 8 हजार नाग क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकते, ज्यापैकी सुरूवातीस 500 क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात क्षेपणास्त्र तयार करणारी एकमेव सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेड करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जुलै 2019)

आदर्श व्यक्तींच्या यादीमध्ये मोदींनी रोनाल्डोलाही मागे टाकले :

  • ब्रिटनमधील ‘योगोव्ह’ या अंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च आणि डेटा अनलिसीस करणाऱ्या कंपनीने जगभरातील आदर्श घ्यावा अशा व्यक्तींची यादी तयार केली आहे.
  • तर मागील वर्षीप्रमाणे यंदाही या यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे पहिल्या स्थानी कायम आहेत.
  • मात्र या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बढती मिळली आहे. मागच्या वर्षी या यादीत आठव्या
    क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी या यादीत पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू आणि इटलीच्या युवेंटसचा मुख्य खेळाडू असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे.
  • तसेच जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ‘योगोव्ह’ने यंदा 41 देशांमधील नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणामध्ये 42 हजारहून अधिक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जगातील सर्वात
    प्रभावशाली 20 पुरुष आणि 20 महिलांची यादी तयार करण्यात आली.

प्रियांका गांधींकडे आता उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे :

  • संपूर्ण उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका
    गांधी यांना सांभाळण्यास सांगण्यात आले आहे.
  • अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, अमेरिका भेटीवर रवाना होण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी घेण्यास सांगितले.

18 वर्षीय ऐश्वर्यची वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी :

  • मध्य प्रदेशमधील खारगाव जिल्ह्यातल्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तसेच 18 वर्षीय ऐश्वर्यने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 459.3 गुणांच्या कमाईसह सुवर्णपदक नावावर केले. या कामगिरी सह त्यानं कनिष्ठ गटातील विश्वविक्रमही नावावर केला.
  • तर या स्पर्धेत भारताचे हे दहावे सुवर्णपदक ठरले. भारतीय संघ 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 4 कांस्यपदक अशा एकूण 23 पदकांसह अव्वल स्थानावर आहे.
  • या स्पर्धेत हंगेरीच्या पेक्लर झलानने 454.8 गुणांसह रौप्य, तर चीनच्या चँगहाँग झँगने 442.8 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. ऐश्वर्यने यापूर्वी 2019च्याच आशिआई अजिंक्यपद स्पर्धेतील कनिष्ठ गटात कांस्यपदक जिंकले होते.

दिनविशेष :

  • 20 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन‘ आहे.
  • सन 1828 या वर्षी मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
  • बडोद्याचे महाराज सर सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने सन 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
  • सन 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जुलै 2019)

You might also like
2 Comments
  1. Shubham shegokar says

    Daily update

  2. Akshay says

    Thank

Leave A Reply

Your email address will not be published.