20 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
20 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 जुलै 2022)
सुटय़ा धान्यांवर ‘जीएसटी’ नाही :
- तांदूळ, गहूसारखे धान्य, डाळी आणि दही, लस्सी आदी खाद्यपदार्थाच्या सुटय़ा विक्रीवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी स्पष्ट केल़े,
- जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के ‘जीएसटी’ अंमलबजावणीचा निर्णय केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या संमतीनेच घेण्यात आला असेही सीतारामन नमूद केल़े .
- पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि केरळ या राज्यांनीही जीएसटी परिषदेच्या जूनअखेर झालेल्या बैठकीत 5 टक्के कर लागू करण्यास सहमती दर्शविली.
- खाद्यपदार्थावर कर आकारला जाण्याची ही पहिलीच वेळ नसून जीएसटी लागू करण्याआधी राज्यांकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जात होता, याकडेही सीतारामन यांनी ट्वीटद्वारे लक्ष वेधले.
Must Read (नक्की वाचा):
विश्वचषक नेमबाजी स्पर्धात अनिष-रिदम जोडीला मिश्र गटात कांस्यपदक :
- युवा नेमबाज अनिष भानवाला आणि रिदम सांगवान यांनी ‘आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.
- भारताच्या या जोडीने चेक प्रजासत्ताकच्या अॅना डेडोव्हा आणि मार्टिन पोधरास्की जोडीला 16-12 अशा फरकाने नमवले.
- या जोडीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील हे दुसरे पदक पटकावले.
- यापूर्वी, त्यांनी मार्चमध्ये कैरो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते.
- 25 मीटर रायफल मिश्र सांघिक गटात विजयवीर सिधू आणि सिमरनप्रीत कौर ब्रार यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.
आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धात हर्षदाला सुवर्ण :
- उदयोन्मुख भारतीय वेटलिफ्टिंगपटू महाराष्ट्राच्या हर्षदा गरुडने आशियाई युवा आणि कनिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
- 18 वर्षीय हर्षदाने 157 किलो वजन उचलले.
- कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील 153 किलोच्या कामगिरीहून हर्षदाची कामगिरी ही चार किलोहून सरस राहिली.
- युवा विभागातील 45 किलो वजनी गटात सौम्या दळवीने कांस्यपदक जिंकले.
- आंतरखंडीय आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्नॅच तसेच क्लीन आणि जर्कसाठी वेगवेगळी पदके दिली जातात.
- मात्र, ऑलिम्पिकमध्ये एकूण वजन उचलण्यासाठी पदक देण्यात येते.
दिनविशेष :
- 20 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन‘ आहे.
- सन 1828 या वर्षी मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
- बडोद्याचे महाराज सर सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने सन 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
- सन 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.