20 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 मार्च 2019)
देशाचे पहिले लोकपाल माजी न्यायमूर्ती पी.सी. घोष:
- केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यामूर्ती घोष हे मानवाधिकार प्रकरणातील विशेष तज्ज्ञ आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
- माजी न्या. घोष यांची लोकपालपदी नियुक्ती करण्याबरोबरच न्यायिक सदस्यांच्या नावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. न्या. दिलीप बी भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाषा कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी हे न्यायिक सदस्य असतील.
- न्यायिक सदस्यांबरोबर दिनेशकुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्रसिंह आणि डॉ. इंद्रजितप्रसाद गौतम हे इतर चार सदस्यही असतील.
- देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या.पी.सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत.
- ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत. न्या. घोष आपल्या निर्णयांमध्ये मानवाधिकारांचे संरक्षणाबाबत वारंवार भाष्य करत असत. न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.
‘चैत्र चाहूल’चे 2019 चे सन्मान जाहीर:
- ‘चैत्र चाहूल‘ तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘रंगकर्मी‘ सन्मान आणि ‘ध्यास‘ सन्मान या दोन्ही सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार रंगकर्मी सन्मान 2019 हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक अजित भगत यांना देण्यात येणार असून ध्यास सन्मान 2019 साठी मालवणातील बालगंधर्व अशी ओळख असलेले ओमप्रकाश चव्हाण यांना देण्यात येणार आहे.
- तर यासोबत संगीत कलाअकादमी सन्मानित अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे, सुनील शानबाग, संध्या पुरेचा आणि प्रा. वामन केंद्रे यांचाही गौरव करण्यात येणार आहे. चैत्र चाहूलतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष सन्मानाचे यंदाचे 14वे वर्षे आहे.
- यंदाच्या चैत्र चाहूल मध्ये ‘अभंग रिपोस्ट’ हा 16व्या शतकात लिहिलेल्या अभंगांचा पाश्चिमात्य पद्धतीचा फोल्क फ्युजन बँड सादर होणार असून त्याचबरोबर मालवणातील ओमप्रकाश चव्हाण आणि त्यांचे दशावतार मंडळ, ‘अभिमन्यू वध’ हे पौराणिक संगीत नाटकातील एक बहारदार प्रवेश सादर करणार आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 3.45 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
युट्युबचे नवीन फिचर देणार फ्री सबस्क्रिप्शन:
- युट्युबने भारतात नुकताच Youtube Music, Youtube Music Premium आणि Youtube Premium लाँच केले आहे. विशेष म्हणजे यूट्यूब प्रीमियमससाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करायची गरज नाही.
- या लाँचनंतर भारतामध्ये स्ट्रिमिंग स्पेसमध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे. Youtube Music म्हणजे गाण्यांचा खजाना आहे. सर्व गाणी एकाच ठिकाणी उपबलब्ध असणार आहेत. मुळ गाण्यासोबत रीमिक्स, लाइव परफॉर्मेंसचे कव्हरेज, कव्हर साँग आणि म्युझिक व्हिडियोही असणार आहे.
- युट्युबवर तुम्हाला कॅटलॉग मिळेल. त्यामध्ये कंपनी दोन प्रकारची सर्व्हिस देत आहे. यामध्ये एक फ्री Youtube Music आणि दुसरे Youtube Music Premium आहे. गतवर्षी जूनमध्ये अमेरिकेसह 17 देशात युट्युबने ही सर्व्हिस सुरू केली होती.
भारतीय जेट एअरवेज संकटात:
- देशातली दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेली ‘जेट एअरवेज‘ ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकलेल्या पगारांच्या निषेधात एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारनेही धाव घेत, या कंपनीला कर्जबाजारी न होऊ देण्यासाठी बँकांना आदेश दिला आहे.
- थकलेल्या पगाराच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने 31 मार्चपर्यंत ठोस योजना न मांडल्यास एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा कंपनीच्या कर्मचारी आणि वैमानिकांनी दिला आहे. ‘हा प्रश्न केवळ पगारापुरता नाही, तर आम्ही तग तरी धरणार की नाही, हा आहे,’ असे एका वैमानिकाने माध्यमांना सांगितले.
- तर या विमान कंपनीच्या ताफ्यातील केवळ 41 विमानांचेच उड्डाण सुरू आहे. कंपनीवर एक अब्ज डॉलरहून अधिक कर्ज आहे. अन्य कंपन्यांची स्पर्धा, रुपयाचे अवमूल्यन आणि इंधनाचे चढे भाव यामुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागत आहेत.
- तसेच या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणुकीचे चित्र निराशाजनक असल्याचा संदेश जाऊ नये आणि बेरोजगारीत वाढ होऊन सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर जनतेत असंतोष पसरू नये, यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत. सरकारने तातडीची बैठक घेतली आणि त्यात बँकांना जेटची पाठराखण करण्याबाबत उहापोह झाला.
दलाई लामांचा भारतातील वारसदार चीनला अमान्य:
- तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे. चीनने लामा यांचे हे म्हणणे फेटाळले असून, तिबेटमधील बुद्धिझमचा पुढील धार्मिक नेता कम्युनिस्ट सरकार मान्य करील, असे स्पष्ट केले.
- दलाई लामा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझा मृत्यू झाला की माझा अवतार भारतात आढळण्याची शक्यता आहे. चीनकडून इतर कोणताही वारसदार नेमण्याचा प्रयत्न झाल्यास तो मान्य होणार नाही, असा इशारा दिला होता.
- तिबेटच्या बुद्धिझममध्ये पुनर्जन्म हा विलक्षण मार्ग आहे. त्याने विधी आणि व्यवस्था निश्चित केल्या आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुअँग यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
- दलाई लामा 1959 मध्ये तिबेटमधून भारतात पळून आले होते. धार्मिक श्रद्धांच्या स्वातंत्र्याचे चीन सरकारचे धोरण आहे. तिबेटी बुद्धिझमच्या धार्मिक कामकाजाबद्दल आमचे नियम असून, पुनर्जन्म व्यवस्थेवर कायदा आहे. आम्ही तिबेटी बुद्धिझमच्या अशा मार्गांचा सन्मान करून संरक्षण करतो, असे गेंग म्हणाले.
दिनविशेष:
- 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन, आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन, आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिन तसेच जागतिक कथाकथन दिन आहे.
- 1602 यावर्षी डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- सन 1916 मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
- महाडचा चवदार तळे सत्याग्रह सन 1917 मध्ये सुरु झाला.
- पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Mpsc study
Hi sir I want iurdp clerk solved exam paper pattern