Current Affairs (चालू घडामोडी)

20 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार

20 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2020)

मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार:

  • दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे.
  • आता भारत, अमेरिका आणि जपानसह ऑस्ट्रेलियन नौदलही मलाबार युद्ध कवायतीमध्ये सहभागी होणार आहे.
  • आतापर्यंत फक्त भारत, अमेरिका आणि जपान हे तीनच देश या कवायतीमध्ये सहभागी व्हायचे.
  • नोव्हेंबर महिन्यात हा युद्धाभ्यास होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला या कवायतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याविषयी विचार सुरु होता.
  • मलाबार कवायती 2020 ऑस्ट्रेलियन संरक्षण दलासाठी एक मोठी संधी आहे
  • असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया यापूर्वी 2007 साली शेवटचे मलाबार कवायतीमध्ये सहभागी झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2020)

अनिका छेब्रोलू ला 25 हजार डॉलर्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर:

  • भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलीस करोनावरील संभाव्य उपचार पद्धतीसाठी 25 हजार डॉलर्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • अनिका छेब्रोलू ही टेक्सासमधील फ्रिस्को येथे आठव्या इयत्तेत शिकत असून तिने ‘थ्री एम यंग सायंटिस्ट’ चॅलेंज स्पर्धेत भाग घेतला होता.
  • तिने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली असून हा रेणू सार्स सीओव्ही 2 म्हणजे करोना विषाणूच्या घातक प्रथिनाला जाऊन चिकटतो.
  • यावर्षीच्या ‘थ्रीएम’ तरुण शास्त्रज्ञ स्पर्धेतील 10 अंतिम उमेदवारांत तिचा समावेश होता.

 एमआय-35 हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन स्टँड ऑफ अँटी टँक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:

  • भारतीय हवाई दलाच्या एमआय-35 हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन सोमवारी स्टँड ऑफ अँटी टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.
  • ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. अशाच आणखी एका क्षेपणास्त्राची पुढील 24 तासांत चाचणी घेण्यात येणार आहे.
  • इंडियन डिफेन्स रिसर्च विंगने आपल्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे.
  • SANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या ‘इमरत’ या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.
  • 7 ते 8 किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज 15 ते 20 किमी आहे.
  • भारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय लष्करातील एव्हिएशन कॉर्प्स (AAC) यांची एकत्रितरित्या 4000 SANT क्षेपणास्त्राची गरज आहे. सन 2021 च्या शेवटापर्यंत ही मागणी डीआरडीओकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
  • एएलएच रुद्र एमके 4 आणि हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यांसाठी SANT हे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे.

चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना:

  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत
  • चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.
  • नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.
  • या प्रकल्पासाठी 14.1 मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
  • याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.
  • आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे.
  • यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”

भारताच्या महिलाही उपांत्यपूर्व फेरीत:

  • भारताच्या महिला संघानेही पुरुषांपाठोपाठ आशिया ऑनलाइन नेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
  • स्विस पद्धतीने झालेल्या प्राथमिक फेरीनुसार भारताच्या महिला संघाने तीनही विजयांची नोंद सोमवारी केली.
  • भारतासमोर उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानचे आव्हान असेल. प्राथमिक फेरीत भारताने सर्वाधिक 16 गुणांची कमाई केली.
  • त्याखालोखाल फिलिपाइन्स आणि इराण यांचे प्रत्येकी 13 गुण आहेत. भारताने सोमवारी फिलिपाइन्सवर 3-1 असा विजय मिळवला.
  • आठव्या फेरीत भारताने कझाकस्तानचा 2.5-1.5 असा पराभव केला. भारताने नवव्या आणि अखेरच्या फेरीत व्हिएतनामला 2.5-1.5 असे नमवले.
  • फिलिपाइन्सविरुद्धच्या सातव्या फेरीत झालेल्या लढतीत भारताकडून मेरी अ‍ॅन गोम्स आणि पी. वी. नंदिधा यांनी विजय नोंदवले.
  • भारताच्या आतापर्यंतच्या 9 फेऱ्यांच्या यशात वैशालीने सर्वाधिक योगदान देत 6.5 गुण मिळवले. गोम्सने पाच गुण मिळवले.

दिनविशेष:

  • 20 ऑक्टोबर हा जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन तसेच जागतिक सांख्यिकी दिन म्हणून पाळला जातो.
  • कृ.भा. बाबर यांनी सन 1950 मध्ये समाजशिक्षणमाला स्थापन केली.
  • चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे सन 1962 मध्ये चीन-भारत युद्धास सुरवात.
  • सन 1969 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना झाली.
  • हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना सन 1970 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago