Current Affairs (चालू घडामोडी)

21 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

21 December 2019 Current Affairs

21 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2019)

‘मिशन शक्ती’यशस्वी :

  • क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीने यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं. या दोन्ही क्षेत्रात भारताने महत्वपूर्ण यश मिळवलं. चांद्रयान-2 मध्ये विक्रम लँडरचा अपवाद वगळता ही मोहिम यशस्वी ठरली.
  • तर ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने आपली क्षमता जगाला दाखवून दिली. मिशन शक्तीच्या यशानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवर येऊन या मोहिमेचं महत्व विषद केलं.
  • ‘मिशन शक्ती’मुळे भारत मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवणारा चौथा देश ठरला. यापूर्वी असे तंत्रज्ञान \ अमेरिका, रशिया आणि चीनने विकसित केलं आहे.
  • तसेच बालकोट एअर स्ट्राइकनंतर बरोबर एक महिन्याने 27 मार्च 2019 रोजी भारताने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरुन उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताने ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये भ्रमण करणारा आपला उपग्रह A-Sat क्षेपणास्त्राद्वारे पाडला. पृथ्वीपासून 2 हजार किलोमीटरपर्यंतची कक्षा ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये येते.
  • तर अवकाशात पृथ्वीपासून 300 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करणारा आपलाच उपग्रह भारताने क्षेपणास्त्राद्वारे पाडला. डीआरडीओच्या नेृत्वाखाली ही संपूर्ण मोहिम पार पडली.
  • उच्च तंत्रज्ञान क्षमता आणि अचूकता या चाचणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या चाचणीद्वारे भारताने अवकाश क्षेत्रातील अत्यंत कठीण समजले जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले.
  • ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने आपण जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिले आहे. डीआरडीओने या चाचणीसाठी बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स प्रोग्रॅममधील इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचा वापर केला.
  • तसेच उपग्रहविरोधी तंत्रज्ञानामध्ये जॅमिंगचाही एक पर्याय असतो. पण भारताने उपग्रह पाडण्याचा पर्याय निवडला.
    लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रहांचा हेरगिरीसाठी आणि लष्करी कारवाईसाठी उपयोग केला जातो. A-Sat दोन मार्गांनी तैनात करता येऊ शकते. अवकाशातून अवकाशात आणि जमिनीवरुन अवकाशाच्या दिशेने A-Sat चा वापर करता येऊ शकतो.
  • 1985 साली अमेरिकन हवाई दलाने एफ-15 विमानातून A-Sat क्षेपणास्त्र डागून P78-1 हा संशोधन उपग्रह पाडला होता. पृथ्वीपासून हा उपग्रह 555 किलोमीटर अंतरावर होता. 2007 साली चीनने आपणही या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे जगाला दाखवून दिले. चीनने SC-19 A-SAT क्षेपणास्त्राने निरुपयोगी बनलेला FY-1C उपग्रह पाडला.
  • A-SAT क्षेपणास्त्राची ठराविक टप्प्यापर्यंत मारक क्षमता आहे. 20 हजार किलोमीटरच्या पुढे असलेले उपग्रह A-SAT च्या टप्प्यामध्ये येत नाहीत. यामध्ये कम्युनिकेश आणि जीपीएस उपग्रहांचा समावेश होतो. पृथ्वीपासून काहीशे किलोमीटर अंतरावर असणारे उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये मोडतात. भारताचे शेजारी असलेल्या चीन आणि रशियाकडे A-SAT अस्त्र आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2019)

कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धात मीराबाई चानूला सुवर्णपदक :

  • माजी जागतिक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
  • ऑलिम्पिक पात्रता प्रकारात चानूने 194 किलो वजन उचलत जेतेपदाला गवसणी घातली. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची अंतिम क्रमवारी जाहीर झाल्यानंतरच पात्रता स्पष्ट होऊ शकेल.
  • तसेच 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या 24 वर्षीय मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात प्रत्येकी एकदाच यशस्वी वजन उचलले. तिने स्नॅच प्रकारात 83 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो वजन उचलले. फ्रान्सच्या अ‍ॅनाइस मायकेल आणि मेनन लॉरेंट्झ यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

पवन गोयंका होणार नवे एमडी-सीईओ :

  • महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा 1 एप्रिल 2020 पासून आपल्या पदावरुन पायउतार होणार आहेत. त्यानंतर ते गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील.
  • तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले पवन गोयंका यांची पद्दोन्नती होणार असून 1 एप्रिल 2020 पासून ते व्यवस्थापकीय संचालक (एमडी) – मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्विकारतील. गोयंका 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील.
  • कंपनीच्या गव्हर्नन्स नॉमिनेशन अॅण्ड रेम्युनरेशन कमिटीच्या (जीएनआरसी) शिफारसींनुसार, संचालक मंडळाने या बदलाला मंजुरी दिली.
  • तसेच ग्रुप प्रेसिडंट असलेले अनिष शाह 1 एप्रिल 2020 पासून मुख्य फायनान्शिअल अधिकारी (सीएफओ) हे पद सांभाळतील. सध्याचे सीएफओ व्ही. एस. पार्थसारथी 1 एप्रिल 2020 रोजी आपल्या पदावरुन निवृत्त होतील.

परिणिती चोप्राला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावरुन हटवले :

  • सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. रविवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारामधून सुरु झालेल्या आंदोलनाची धग गुरुवारी देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी
    सोशल नेटवर्किंगवरुन या कायद्याविरोधात आपले मत नोंदवले आहे.
  • मात्र थेटपणे या कायद्याला विरोध करणे अभिनेत्री परिणिती चोप्राला महागात पडले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या हरयाणा सरकारच्या अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (सदिच्छा दूत) असणाऱ्या परिणितीला हटवण्यात आलं आहे.
  • तसेच काही दिवसांपूर्वीच या कायद्याला विरोध करणारा अभिनेता सुशांत सिंहला ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे.

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर :

  • निरनिराळ्या कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यावर्षी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये विविध कारणांमुळे 95 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
  • नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्या विरोधात देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये यासाठी देशाच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
  • इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘इंडियन कौन्सिल फॉक रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’सोबतच दोन थिंक टँकनं सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
  • 2012 पासून आतापर्यंत देशभरात 367 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 2018 मध्ये जगभरातील इंटरनेट सेवेच्या बंदच्या प्रकरणांपैकी तब्बल 67 टक्के प्रकरणं ही भारतातील आहेत.

राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक :

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे.
  • कर्नाटकातील 14 वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने 201 धावांची खेळी केली. 256 चेंडूत 22 चौकारांसह समितने 201 धावा केल्या.
  • तर हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद 94 तर गोलंदाजीत 26 धावा देत 3 बळी घेतले.

दिनविशेष:

  • सन 1913 मध्ये ‘ऑर्थर वेन‘ यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
  • भारताचे 17वे सरन्यायाधीश ‘पी.एन. भगवती‘ यांचा जन्म 21 डिसेंबर 1921 रोजी झाला.
  • भारतीय लेखक, कवी तसेच समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मध्ये झाला होता.
  • ‘रघुनंदन स्वरूप पाठक‘ यांनी सन 1986 मध्ये भारताचे 18वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2019)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago