21 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता- राफेल फायटर:
29 जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता- राफेल फायटर:

21 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 जुलै 2020)

29 जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता- राफेल फायटर:

  • बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी येत्या 29 जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
  • हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही राफेल फायटर विमाने तैनात करण्यात येतील. युद्धात गेम चेंजर ठरु शकणाऱ्या या विमानांचा अंबाल एअर बेसवर मुख्य तळ असणार आहे.
  • सर्व काही नियोजनानुसार झाले, तर 20 ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.
  • IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे.
  • राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जुलै 2020)

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन:

  • मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले.
  • ते 85 वर्षांचे होते. लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोषने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आज सकाळी 5.30 च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • लालजी टंडन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते तसेच त्यांचे डायलासिस सुरु होते” असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.

लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले- ऑक्सफर्डने तयार केलेली करोना लस:

  • ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली करोना प्रतिबंधक लस शेकडो लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैज्ञानिकांनी केली आहे.
  • प्रायोगिक लशीच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून एप्रिलमध्ये एक हजार जणांचे दोन गट करून ही लस देण्यात आली होती.
  • त्यातून ही लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले होते, पण प्रतिकारशक्ती निर्मितीत ही लस किती प्रभावी ठरते याचे विश्लेषण बाकी होते. प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात ही लस यशस्वी ठरली आहे.
  • ऑक्सफर्ड विद्यापीठाची ही लस भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट उत्पादित करणार असून त्याचे लाखो डोस उपलब्ध करण्याचे आश्वासन या कंपनीचे प्रमुख अदर पूनावाला यांनी आधीच दिले आहे.
  • या लशीमुळे मानवी शरीरात किती प्रतिकारशक्ती तयार होते याचे निष्कर्ष सोमवारी हाती आले. ते ‘लॅन्सेट’ नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार या लशीने 18 ते 55 वयोगटातील लोकांमध्ये दुहेरी प्रतिकारशक्ती निर्माण केली आहे.

संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयानाचे नाव “अल अमल”:

  • संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले.
  • अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.
  • ‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान 1.3 टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.58 वाजता सोडण्यात आले.
  • यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत.
  • सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान 49 कोटी 50 लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे.

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज- जगज्जेता विश्वनाथन आनंद:

  • पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद चेस 24 लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला असून सलामीच्या सामन्यात त्याला रशियाच्या पीटर स्विडलरशी झुंज द्यावी लागणार आहे.
  • करोनाच्या साथीमुळे गेले तीन महिने जर्मनीमध्ये अडकलेला भारताचा ग्रँडमास्टर आनंद मायदेशी परतला असून तो पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होत आहे
  • आनंदला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला मॅग्नस कार्लसन, व्लादिमिर क्रॅमनिक, अनिश गिरी, पीटर लेको, इयान नेपोमनियाची, बोरिस गेलफंड, डिंग लिरेन आणि वॅसिल इव्हानचुक यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
  • ही स्पर्धा म्हणजे मॅग्नस कार्लसन चेस टूरचा भाग असून विजेता 9 ते 20 ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

दिनविशेष :

  • इ.स. पूर्व 356 मध्ये जगातील सात आश्चर्याँपैकी एक ‘एफिसस आर्टेमिसचे मंदिर’ नष्ट झाले.
  • सन 2002 मध्ये जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्‍या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • स्वातंत्र्यसैनिक तसेच रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचा जन्म 21 जुलै 1910 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.