एन. बिरेन सिंह यांची पुन्हा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी निवड :
एन. बिरेन सिंह हेच दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री राहतील, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी इंफाळमध्ये जाहीर केले.
भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाने सिंह यांची आपले नेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे भाजपने केंद्रीय निरीक्षक म्हणून मणिपूरला पाठवलेल्या सीतारामन यांनी सांगितले.
तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यांच्या सभागृहात 32 जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे.
मोदी भेटीनंतर जपानची गुजरातसाठी मोठी घोषणा :
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता आता भारतानेही कंबर कसली आहे.
लवकरच भारत इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनासाठी महत्वाचं केंद्र बनू शकतं.
जपानमधील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने गुजरातमध्ये 1.26 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
तर या गुंतवणुकीच्या आधारे गाड्या तसंच बॅटरींच्या निर्मितीसीठी फॅक्टरी उभारली जाईल.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा शनिवारी भारत भेटीवर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
शरद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलामध्ये विलीन :
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी त्यांच्या लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय जनता दलामध्ये विलीनीकरण केले.
भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांचे ऐक्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
संयुक्त जनता दलातून फुटल्यानंतर शरद यादव यांनी पक्ष स्थापन केला होता.
इंडियन सुपर लीग फुटबॉलत हैदराबादला पहिल्यांदा ‘आयएसएल’चे विजेतेपद :
हैदराबाद एफसी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये केरळ ब्लास्टर्सचा 3-1 पराभव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद मिळवले.
पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीने तीन पेनल्टीचा बचाव करत हैदराबादच्या जेतेपदामध्ये निर्णायक भूमिका पार पाडली.
त्यापूर्वी निर्धारित आणि भरपाई वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत होता.
शूटआऊटमध्ये हैदराबाद संघाकडून जोओ व्हिक्टर, खासा कामरा आणि हालीचरण नरझारे यांनी गोल मारले.
केरळ ब्लास्टर्सकडून एकमेव गोल आयुष अधिकारीने मारला.
दिनविशेष :
देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक ‘मानवेंद्रनाथ रॉय’ यांचा जन्म 21 मार्च 1887 मध्ये झाला.
21 मार्च 1916 मध्ये भारतरत्न शहनाईवादक ‘बिस्मिल्ला खान’ यांचा जन्म झाला.
सन 1977 मध्ये भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
21 मार्च 2003 मध्ये जळगाव महानगरपालीकेची स्थापना झाली.
सोशल मीडिया साइट ‘ट्विटर’ची स्थापना 21 मार्च 2006 रोजी झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.