21 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 मे 2019)
फॉर्म्युला वन चॅम्पिअन निकी लॉडा यांचे निधन :
- तीन वेळा फॉर्म्युला वन चॅम्पिअन राहिलेले महान खेळाडू निकी लॉडा यांचे निधन झाले आहे.
- तर ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.
- तसेच फॉर्म्युला वन (F1) स्पर्धेमध्ये त्यांनी तीन वेळा विजेतेपद पटकावले होते.
- फेरारीसाठी 1975, 1977 आणि मॅकलॅरेनसाठी त्यांनी 1984 मध्ये विजेतेपद पटकावले होते.
‘बँक ऑफ बडोदा’च्या 800 ते 900 शाखा होणार बंद:
- सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे.
- तर कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे.
- तसेच देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचं एक एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात विलीनीकरण करण्यात आले होते.
- देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणापासून याबाबत विचार सुरू आहे. आता या तीन बँकांची कार्यक्षमता
वाढवण्याच्या हेतूने काहीच दिवसात तब्बल 800 ते 900 शाखांना टाळं लागण्याची किंवा इतर शाखांमध्ये विलीन करण्याची तयारी सुरु आहे. - एप्रिल महिन्यापासूनच बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार काही शाखांचे अन्यत्र स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत.
युवराज सिंग निवृत्तीच्या तयारीत :
- भारतीय संघातील स्फोटक फलंदाज युवराज सिंग निवृत्तीच्या विचारात आहे.
- गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे.
- पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली आहे.
- तर बीसीसीआयकडून ही परवानगी मिळाल्यास निवृत्ती घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
दिनविशेष:
- 21 मे 1881 मध्ये वॉशिंग्टन (डी.सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
- पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना 21 मे 1904 रोजी झाली.
- पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे 21 मे 1991 रोजी आत्मघातकी पथकाने हत्या केली.
- 21 मे 1994 मध्ये 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा