21 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
21 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2019)
अमोल यादव यांना उड्डाण परवाना मंजूर :
- प्रायोगिक विमान तयार करणारे मुंबईकर वैमानिक अमोल यादव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर तातडीने चक्रे फिरून यादव यांना विमान उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून मंजुरी मिळाली आहे.
- कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे. त्याला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांनी 18 वर्षे खर्च केली आहेत.
- नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून (डीजीसीए) नियमानुसार ‘उड्डाणाचा परवाना’ (परमिट टू फ्लाय) मिळण्याच्या प्रक्रियेला मंजुरीसाठी 2011 सालापासून यादव यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवरून त्यांना तीन दिवसांपूर्वीच ही मंजुरी मिळाली.
Must Read (नक्की वाचा):
SBI मध्ये एक नोव्हेंबरपासून ‘हा’ महत्त्वाचा बदल :
- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.
- तर व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे.
- तसेच परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
- यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोनाल्डोच्या 701व्या गोलमुळे युव्हेंटस विजयासह गटात अव्वल :
- ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मिरालेम पॅनिक यांनी नोंदवलेल्या गोलच्या बळावर युव्हेंटसने बोलोग्नाचा 2-1 असा पराभव करून सीरी ए चषक फुटबॉल स्पर्धेतील गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे.
- तर या आठवडय़ात सप्तशतकी गोलची नोंद करणाऱ्या 34 वर्षीय रोनाल्डोने 19व्या मिनिटाला 701वा गोल साकारला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात आठव्या मिनिटाला पॅनिकने युव्हेंटसच्या खात्यावर दुसऱ्या गोलची भर घातली.
- पहिल्या सत्रात बचावपटू डॅनिलो लारांगेरियाने 26व्या मिनिटाला गोल करीत बोलोग्नाला बरोबरी साधून दिली होती.
दिनविशेष :
- 21 ऑक्टोबर 1879 मध्ये थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
- सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना 21 ऑक्टोबर 1943 मध्ये झाली.
- 21 ऑक्टोबर 11943 मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
- फ्रान्समधे स्त्रियांना 21 ऑक्टोबर 1945 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला.
- 21 ऑक्टोबर 1833 मध्ये स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा