देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येतमार्च 2020 च्या संपलेल्या तिमाहीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या 74.3कोटींवर पोहोचली आहे.
या एकूण इंटरनेट युजर्सपैकी सर्वाधिक 52.3 टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
23.6 टक्क्यांसह भारती एअरटेल दुसऱ्यास्थानी तर व्होडाफोन-आयडियाची 18.7टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.
फेलुदा कोविड टेस्टिंग बाजारात आणण्यास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिली:
टाटा समूहानं सीएसआयआरच्या सहकार्यानं विकसित केलेली फेलुदा कोविड टेस्टिंग किटच्या बाजारात आणण्यास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिली आहे.
फेलुदा ही कमी किंमतीतील कोविड टेस्टिंग किट आहे.
टाटा समूह आणि सीएसआयआर-आयजीआयबीनं विकसित केलेली फेलुदा ही पहिली व्यावसायिक कोविड टेस्टिंग किट आहे.
टाटा समूहानं सीएसआयआर-आयजीआयबी व आयसीएमसोबत या कोविड किटसंदर्भात काम केलं. जेणेकरून एक चांगल्या दर्जाची किट तयार करता येईल, ज्याचा जलद चाचण्या करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल.
हे मेड इन इंडिया उत्पादन असून, जे सुरक्षित आहे. विश्वासार्ह असण्याबरोबर आर्थिकदृ्ष्ट्या परवडणारे आहे,” असं आयएसआयआरनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
मँचेस्टर युनायटेडला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला:
मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
क्रिस्टल पॅलेसने युनायटेडला 3-1 असे पराभूत केले. एडी नके तिया याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे आर्सेनलने वेस्ट हॅम युनायटेडला 2-1 असे हरवत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
क्रिस्टल पॅलेसकडून विल्फ्रेड झाहाने दोन तर आंद्रोस टाऊनसेंड याने एक गोल करत विजयात योगदान दिले.
दिनविशेष:
भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म 21 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
सन 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना सन 1968 मध्ये झाली.
सन 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.