22 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय गणित दिन

22 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2021)

भारतविरोधी यूट्यूब वाहिन्या, संकेतस्थळांवर बंदी :

  • राष्ट्रविरोधी माहिती आणि खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने 20 यूट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
  • तर माहिती प्रसारण खात्याने सोमवारी याबाबत दोन आदेश काढले.
  • तसेच यूट्यूबला आदेश देऊन 20 वाहिन्या बंद करण्यास सांगितले, तर दोन संकेतस्थळांवरही बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.
  • यूट्यूबवरील 20 वाहिन्या पाकिस्तानातून चालवल्या जात असून त्यांद्वारे भारतासंबंधी संवेदनशील विषयांबाबत चुकीची आणि तथ्यहीन माहिती आणि बातम्या प्रसारित केल्या जातात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2021)

विवाह वयाचे विधेयक स्थायी समितीकडे :

  • महिलांचे विवाहाचे कायदेसंमत वय 18 ऐवजी 21 करणारे बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयक केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी लोकसभेत सादर केले.
  • पण विरोधकांनी घेतलेल्या अनेक आक्षेपांनंतर हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली होती.
  • तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये मुलींच्या लग्नाचे किमान वय वेगवेगळे असून या दुरुस्तीद्वारे सहा व्यक्तिगत कायद्यांमध्ये बदल केले जातील आणि मुलींच्या लग्नाचे कायदेसंमत वय मुलांप्रमाणे 21 वर्षे केले जाईल.
  • भारतीय ख्रिश्चन, पारशी, मुस्लीम, हिंदू या धर्मांतील लग्न व घटस्फोट कायदे, तसेच विशेष विवाह कायदा आणि परदेशी विवाह कायदा आदी कायद्यांमध्ये या विधेयकाद्वारे दुरुस्ती केली जाणार आहे.

प्रो कबड्डीचा आठवा हंगाम आजपासून :

  • प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम आजपासून बेंगळूरुच्या हॉटेलमध्ये रंगणार असून, याकरिता 12 संघ सज्ज झाले आहेत.
  • तर हे सामने जैव-सुरक्षा परिघात होणार असून, प्रेक्षकांना ते टेलिव्हिजनवरच पाहता येणार आहेत.
  • माजी विजेते यू मुंबा आणि बेंगळूरु बुल्स यांच्यातील सामन्यात आठव्या हंगामाला प्रारंभ होईल.
  • त्यानंतर तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायव्हाज या दाक्षिणात्य संघांमधील झुंज रंगेल, तर तिसरा सामना गतविजेते बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात होईल.
  • हंगामाच्या प्रारंभीचे चार दिवस व त्यानंतर प्रत्येक शनिवारी तीन सामने होणार आहेत.

दिनविशेष:

  • 22 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिन‘ आहे.
  • सन 1851 मध्ये भारतातील पहिली मालगाडी रूरकी येथे सुरू करण्यात आली.
  • भारतीय तत्त्वज्ञ ‘सरदादेवी‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला होता.
  • थोर भारतीय गणिती ‘श्रीनिवास रामानुजन‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
  • भारतातील विश्वभारती विद्यापीठ सन 1921 मध्ये सुरू झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2021)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago