22 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

नापासचा शेरा
नापासचा शेरा

22 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 फेब्रुवरी 2020)

जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश :

  • टाइम्स हायर एज्युकेशनच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यावर्षी 11 भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले असून, 2015 पासून भारताला हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे.
  • तर 2015 पासून पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये 11 भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे.
  • टाइम्स हायर एज्युकेशनच्या माहितीनुसार पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये चीनच्या सर्वात जास्त 30 विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. या रँकिंगसाठी 47 देश आणि विभागांचा समावेश होता.
  • तसेच एकूण 533 विद्यापीठांत एकूण 56 भारतीय विद्यापीठांनी फूल रँकिंग मिळवले होते.
  • टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने (बंगळुरू) पहिले स्थान मिळवले होते, तरी दोन पायऱ्या खाली येऊन 16 क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे 32 व 34 वे स्थान मिळवले. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांपैकी एक अमृत विश्व विद्यापीठमने प्रथमच पहिल्या 100 संस्थांच्या यादीत 51 वे स्थान मिळवले.
  • तर 2019 मध्ये हे विद्यापीठ 141 व्या स्थानी होते. 2019 च्या तुलनेत अमृत विद्यापीठमने रँकिंगच्या सगळ्या मापनात (मेट्रिक्स) सुधारणा केल्याचे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले. इन्स्टिट्यूटस् ऑफ इमिनन्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या व पहिल्या 100 संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठांनी रँकिंगमध्ये फार मोठी सुधारणा केली आहे.

बारावीतील नापासचा शेरा होणार गायब :

  • बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासचा शेरा काढून ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ किंवा ‘कौशल्य विकासासाठी पात्र’ शेरे देण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे.
  • तर दहावीच्या गुणपत्रिकेवरून नापास/ अनुत्तीर्ण शेरा याआधीच काढून टाकण्यात आला आहे. याचप्रमाणे कौशल्य विकास विभागाने 10 वी, 12 वीतील ‘कौशल्य विकासासाठी पात्र’ असा शेरा मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतू योजना आखली आहे. आता बारावीच्या गुणपत्रिकेवरही सुधारित शेरे असतील.
  • तसेच बारावीच्या पुरवणी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभागाच्या कौशल्य सेतू योजनेचा लाभ मिळेल. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण दिले जाईल. ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असेल.

रेल्वे प्रवासात मिळणार 50 टक्के सवलत :

  • रेल्वे मंत्रालयाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’करिता 50 टक्के विशेष सवलत देण्याचे जाहीर केले आहे.
  • मानव संसाधन मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी एका राज्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी तरुणांना विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेसोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता यांनी दिली.
  • तसेच नोकरीला असणार्‍या तरुणांचे दरमहा रुपये 5 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असते़ त्यांना सेकंड / स्लीपर श्रेणीच्या मूलभूत भाड्यात (बेसिक भाड्यात) 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत एक विशेष बाब म्हणून मंजूर केली गेली आहे आणि एक उदाहरण म्हणून प्रस्तुत केली जाऊ नये. ही सवलत केवळ सामान्य गाडीच्या सेवांमध्ये दिली जाईल आणि ही सवलत विशेष गाड्या / कोच बुकिंगसाठी लागू नसणार आहे़.
  • प्रवासाच्या स्थानकापासून ते उत्सवाच्या ठिकाणी सेवा देणाºया स्थानकापर्यंत परतीच्या प्रवासाची तिकिटे 300 कि.मी.पेक्षा जास्त प्रवास करणाºया व्यक्तींना मेल एक्स्प्रेस भाड्यांच्या द्वितीय/ स्लीपर श्रेणी एक तरफा प्रवास भाड्यात सवलत दिली जाणार आहे.
  • तर या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विविध राज्यांच्या मानव संसाधन विकास संबंधित विभागाच्या सचिवांकडून आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे़ तथापि, सप्लेमेन्टरी शुल्क, आरक्षण शुल्क आणि इतर लागू शुल्क इत्यादी दोन्ही दिशासाठी पूर्ण आकारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या स्टार फिरकीपटूचा क्रिकेटला अलविदा :

  • भारताचा स्टार फिरकीपटू प्रग्यान ओझा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले.
  • प्रग्यानने शुक्रवारी तत्काल प्रभावाने व्यावसायिक क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्ती स्वीकारली.
  • प्रग्यान ओझाने 2008 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 16 वर्षे त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
  • तर 2013 साली त्याने भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण त्यानंतर मात्र तो देशांतर्गत क्रिकेटपुरताच मर्यादित राहिला.

पाकिस्तान ‘करडय़ा यादी’तच कायम :

  • ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘करडय़ा यादी’तच कायम ठेवले असून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारे आर्थिक साहाय्य रोखण्यात अपयश आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
  • दहशतवादी कारवायांना होणारे अर्थसाह्य़ रोखण्यात यश आल्याचा दावा करून ‘एफएटीएफ’च्या तावडीतून सुटका करून घेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत.
  • तर ‘एफएटीएफ’च्या पॅरिसमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला करडय़ा यादीतच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच जूनपर्यंत व्यापक कृती योजना पूर्ण न केल्यास त्याचा पाकिस्तानच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला दिला आहे.
  • पाकिस्तानला करडय़ा यादीतून पांढऱ्या यादीत प्रवेशासाठी 39 पैकी 12 मतांची गरज आहे, तर काळ्या यादीत जाणे टाळण्यासाठी पाकिस्तानला तीन देशांच्या पाठिंब्याची गरज आहे. ‘एफएटीएफ’च्या उपसमितीने पाकिस्तानला करडय़ा यादीत ठेवण्याची शिफारस तीन दिवसांपूर्वी केली होती.
  • पाकिस्तानला करडय़ा यादीत कायम ठेवण्यात आल्याने त्यांना आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक, एडीबी आणि युरोपीय समुदायाकडून आर्थिक साहाय्य मिळण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. ‘एफएटीएफ’च्या आदेशांचे पालन करण्यात अपयश आल्यास पाकिस्तानला उत्तर कोरिया आणि इराणसह ‘काळ्या यादी’त टाकले जाऊ शकते.

आशियाई कुस्ती स्पर्धात साक्षी मलिकला रौप्यपदक :

  • भारतीय महिलांनी आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पदकांची लयलूट कायम राखताना शुक्रवारी एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण चार पदके कमावली.
  • तसेच अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी रुयकेकडून पराभूत झाल्यामुळे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर विनेश फोगट, अंशू मलिक आणि गुरशरण प्रीत कौर यांनी कांस्यपदके पटकावली.
  • तर 65 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताला साक्षीकडून सुवर्णपदकाच्या आशा होत्या. परंतु नाओमीने सुरुवातीने मिळवलेली दोन गुणांची आघाडी कायम राखत अखेरीस साक्षीला 2-0 असे नमवले.
  • कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने 53 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या थि लाय किएयूला 10-0 असे नामोहरम केले.
  • याचप्रमाणे 57 किलो गटात अंशूने उझबेकिस्तानच्या सेव्हारा ईशमुरोतोव्हाचा 4-1 असा पराभव केला.

कमलनाथ सरकारचा अजब निर्णय :

  • मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने पुरुष बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवा आद्यादेश जारी केला आहे.
    2019-20 या वर्षात जर कमीत कमी एकाची नसबंदी करण्यात अपयश आल्यास त्याचं वेतन कपात केलं जाईल, असा आदेश कमलनाथ सरकारनं जारी केला आहे.
  • प्रसारमाध्यांच्या वृत्तानुसार, नसबंदीसंबंधी दिलेलं टार्गेट पुर्ण न केल्यास त्या कर्मचाऱ्याला सक्तीची निवृत्ती दिली जाईल.
  • तर या आद्यादेशामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार मध्य प्रदेशातील 0.5 टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे.

दिनविशेष:

  • महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला.
  • बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला होता.
  • सन 1958 मध्ये इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
  • श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सन 1978 मध्ये भारताचे 16वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.