22 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

अफशान खान
अफशान खान

22 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 फेब्रुवारी 2023)

संयुक्त राष्ट्रांच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान :

  • भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे.
  • संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली.
  • अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे.
  • ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे.
  • सर्व प्रकारच्या कुपोषणाचे 2030 पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.
  • सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल.
  • ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागांत महाराष्ट्र:

  • हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे.
  • या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे 50 विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे.
  • हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.
  • या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे.
  • चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील 2050 मध्ये अव्वल 200 पैकी अर्ध्याहून अधिक जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB:

  • इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे.
  • ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील.
  • ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.
  • ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल.
  • ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडक सलग चौथ्यांदा भारताकडे:

  • भारतीय संघाने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली.
  • यासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली.
  • त्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही आणि बॉर्डर-गावस्कर करंडक सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखणार हेदेखील सुनिश्चित झाले.
  • भारताने 2016 सालापासून बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या कसोटी मालिकांमध्ये वर्चस्व गाजवले आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध:

  • भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले.
  • या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले.
  • भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत.
  • सोमवारी आर. नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले.

दिनविशेष:

  • महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला.
  • बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला होता.
  • सन 1958 मध्ये इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
  • श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सन 1978 मध्ये भारताचे 16वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
You might also like
1 Comment
  1. Dhanashri bedse says

    Very nice mam thank you🌹

Leave A Reply

Your email address will not be published.