Current Affairs (चालू घडामोडी)

22 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 January 2020 Current Affairs In Marathi

22 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 जानेवारी 2020)

झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर :

  • भारतातील 287 शहरांपैकी 231 शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे.
  • झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.
  • तसेच दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे.
  • तर यात पीएम 10 कणांचे प्रमाण देशातील 287 शहरांत मोजण्यात आले.
  • मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे.
  • देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण 28 ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही.
  • ग्रीनपीसच्या भारतीय शाखेने एअरोपोकॅलप्स 4 अहवाल मंगळवारी जारी केला असून त्यात देशातील शहरांच्या हवा प्रदूषणाचा ताळेबंद मांडला आहे.
  • 2018 मध्ये देशातील एकूण 287 शहरांच्या हवेचे 52 दिवस निरीक्षण करून असे सांगण्यात आले, की 231 शहरांत पीएम 10 कणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात जलतरणात महाराष्ट्राची सुवर्णझळाळी :

  • महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरण क्रीडाप्रकारात अपेक्षा फर्नाडिस, केनिशा गुप्ता आणि मिहीर आम्ब्रे यांनी आपापल्या शर्यती जिंकत महाराष्ट्राच्या सुवर्णयशात मोलाचा वाटा उचलला.
  • तट वेटलिफ्टिंगमध्ये साताऱ्याच्या वैष्णवी पवार हिने सुवर्णपदक जिंकले.
  • अपेक्षाने मुलींच्या गटात 200 मीटर बटरफ्लाय शर्यत 2 मिनिटे 21.52 सेकंदात जिंकली. त्यानंतर तिने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातही 34.56 सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळवले.
  • केनिशाने 50 मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत 27.29 सेकंद अशी वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले.

झेन सदावर्ते, आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविणार :

  • प्रजासत्ताक दिनी मुंबईची झेन सदावर्ते व औरंगाबादचा आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येईल.
  • झेनने परळमधील तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांचे प्राण वाचविले होते, तर आकाशने नदीत बुडणाऱ्या आई-मुलीला वाचविले होते. तर देशातून 22 मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात 10 मुली तर 12 मुलांचा समावेश आहे. एका बालकाला मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तसेच पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.
  • तर सहा श्रेणींमध्ये देण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते, तसेच वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.

दिनविशेष:

  • सन 1947 मध्ये भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
  • डेहराडून येथे सन 1963 मध्ये अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन करण्यात आले.
  • सन 1971 मध्ये सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  • आय.एन.एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू सन 2001 या वर्षी नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
  • सन 2015 मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago