22 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
22 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 जुलै 2022)
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती :
- देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे.
- तर या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत.
- तसेच या निवडणुकीसाठी 99 टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता.
- देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 100 टक्के मतदान पार पडले होते.
- तर या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे.
- त्या येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील.
- तसेच याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.
Must Read (नक्की वाचा):
गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :
- अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
- तर त्यांची एकूण संपत्ती 115.4 अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढय़ असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे.
- अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.
- ‘फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
- बर्नाड अॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे दुसऱ्या तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले.
राजस्थानात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार :
- देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
- यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
- राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून ही माहिती समोर आली असून देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- इतर गुन्हयांमध्ये महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या बाबतीत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धात अन्नू अंतिम फेरीत :
- भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात 59.60 मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
- अन्नूला ब-गटाच्या पात्रता फेरीत पाचवा क्रमांक तर दोन्ही गटांमध्ये मिळवून आठवा क्रमांक मिळाला.
- पात्रता फेऱ्यांमधील दोन्ही गटांतून 62.50 मीटर अंतर गाठणाऱ्या तीन खेळाडूंसह सर्वोत्तम 12 जणींना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन UAE मध्ये होणार :
- आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आता श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे.
- तशी माहिती बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी दिली आहे.
- याआधी ही स्पर्धा श्रीलंका येथे खेळवली जाणार होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून या देशावर राजकीय तसेच आर्थिक संकट ओढावले आहे.
- याच कारणामुळे ही स्पर्धा आता श्रीलंका ऐवजी यूएई येथे खेळवली जाणार आहे.
- दरम्यान, वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
लॉर्ड्सवर द्विशतक ठोकणारा चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय :
- भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ससेक्स क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे.
- सध्या ससेक्स आणि मिडलसेक्स क्रिकेट क्लब दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती सामना सुरू आहे.
- तर या सामन्यात पुजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
- त्याने बुधवारी ससेक्ससाठी हंगामातील तिसरे द्विशतक झळकावले.
- तसेच गेल्या 108 वर्षांमध्ये ससेक्ससाठी अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
- त्याचबरोबर क्रिकेटची पंढरी अशी ओळख असणाऱ्या लॉर्ड्सवर द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
दिनविशेष :
- 22 जुलै 1908 मध्ये देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.
- पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची 22 जुलै 1944 मध्ये सुरुवात झाली.
- 22 जुलै 1898 मध्ये शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म झाला.