Current Affairs (चालू घडामोडी)

22 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 मार्च 2019)

विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताला 368 पदके:

  • संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे झालेल्या विशेष आलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी ठसा उमटवताना तब्बल 85 सुवर्ण पदकांसह 368 पदकांची घसघसीत कमाई केली.
  • 14 ते 21 तारखेदरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारताने 154 रौप्य तसेच 129 कांस्य पदकेही जिंकली. भारतीय पथकामध्ये एकूण 284 खेळाडूंचा समावेश होता.
  • भारताने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली ती पॉवरलिफ्टिंगमध्ये. यात भारतीय खेळाडूंनी आपली ताकद सिद्ध करताना 20 सुवर्ण, 33 रौप्य आणि 43 कांस्य अशी एकूण 96 पदकांची लयलूट केली. रोलर  स्केटिंगमध्ये भारताने जिंकलेल्या 49 पदकांत 13 सुवर्ण, 20 रौप्य आणि 16 कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • सायकलिंग प्रकारात भारताने 11 सुवर्णपदकांसह 45 पदके आपल्या नावे केली. अ‍ॅथलेटिक्स प्रकारामध्ये भारतीय खेळाडूंच्या वाट्याला एकूण 39 पदके आली. यामध्ये 5 सुवर्ण, 24 रौप्य आणि 10  कांस्यपदकांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मार्च 2019)

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर कालवश:

  • ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर (वय 83 वर्षे होते) यांचे वृद्धापकाळाने 20 मार्च रोजी निधन झाले. कोल्हटकर यांच्या जाण्याने डोंबिवलीतील नाट्यचळवळीचा आधारस्तंभ हरवल्याची भावना नाट्यक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
  • कोल्हटकर यांना लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. पोद्दार महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर मुंबई साहित्य संघ व सायं मित्र मंडळातर्फे होणाऱ्या नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या.
  • विशेष म्हणजे मामा पेंडसे यांच्याबरोबर ‘भाऊबंदकी’मध्ये रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका केली. 1966 ते 71 पर्यंत रघुवीरनगर, पाटणकरवाडी येथे झालेल्या नाटकात सुहासिनी अभ्यंकर यांच्याबरोबर ‘येथे जन्मली व्यथा’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली.
  • तर त्या नाटकास पहिले पारितोषिक मिळाले. त्याचवेळी चारुदत्त मित्र मंडळातर्फे राम गणेश गडकरी यांच्या पुण्यप्रभाव, राजसंन्यास यासारख्या जुन्या व दर्जेदार नाटकांत भूमिका केल्या. ‘आम्हाला हाच मंत्री हवाय’ या नाटकातील रामचंद्र अमात्य यांची भूमिका त्यांनी केली.
  • लोकसेवा मंडळ स्पर्धेतील ‘तुझे आहे तूजपाशी’ नाटकात सतीशची भूमिका त्यांनी केली होती. त्या स्पर्धेत त्यांना तीन प्रशस्तीपत्रके मिळाली होती. तरुण वयात त्यांनी डोंबिवलीतील गुरु दत्त मित्र मंडळात प्रवेश केला. या संस्थेच्या माध्यमातून शहरातील नवोदित कलाकारांना त्यांनी एकत्र आणले जात होते.
  • शहरात नाट्यचळवळ रुजावी, यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करतानाच त्यांनी ‘सहलीला सावली आली’, ‘अर्ध्याच्या शोधात दोन’ यासारख्या प्रायोगिक नाटकांत अभिनय केला. ‘सहलीला सावली आली’मधील त्यांची भूमिका गाजली होती.
  • अभिनयासह कलाकारांना मार्गदर्शन करत नाट्यचळवळ रुजवणे यांची धुरा त्यांनी पेलली होती. तसेच नलिनी जोशीसोबत त्यांनी संगीत नाटकात भूमिका केली होती.

माजी अव्वल बॅडमिंटनपटू पेरसोनवर दीड वर्ष बंदी:

  • जागतिक क्रमवारीत एके काळी सहाव्या स्थानापर्यंत पोहोचलेला डेन्मार्कचा जोकीम पेरसोन याने सामनानिश्चिती आणि सट्टेबाजीला साहाय्य केल्याचे कारण देत जागतिक बॅडमिंटन महासंघाने त्याच्यावर दीड वर्षांसाठी बंदी घातली आहे.
  • चार प्रकरणांमध्ये जोकीम हा दोषी आढळला आहे. त्याला दीड वर्षांच्या बंदीसह 4500 डॉलर्स इतकी रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
  • गतवर्षी मलेशियाच्या दोघा बॅडमिंटन खेळाडूंवर सामनानिश्चिती आणि भ्रष्टाचार प्रकरणात 15 आणि 20 वर्षे बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे त्या तुलनेत ही कारवाई सौम्यच मानली जात आहे.

अंजूरमध्ये घडतोय ऐतिहासिक अशोकस्तंभ:

  • ठाणे येथील कोर्टनाका परिसरात ठाण्याचे नाक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि मागील 35 वर्षांपूर्वी अवजड वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झालेल्या ऐतिहासिक अशोकस्तंभाची आता नव्याने भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात मूर्तिकार श्रेयस खानविलकर हे निर्मिती करत आहेत. तो लवकरच ठाण्यात स्थानापन्न होणार आहे.
  • बाहेरगावहून ठाण्यात येणाऱ्या किंवा स्थानिक नागरिकांसाठी कोर्टनाक्यावर असलेला अशोकस्तंभ म्हणजे एक मैलाचा दगड होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात ठाणे कोर्टनाका आणि अशोकस्तंभ सुपरिचित होता. स्वातंत्र्यानंतर ठाण्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढा आणि शहिदांची आठवण म्हणून या स्तंभाची उभारणी 1952 साली केली.
  • तर या कार्यात हातभार लावणाऱ्या ठाणेकरांची आणि याच ठिकाणी इंग्रज शिपायांचे आसूड अंगावर झेलणार्‍या देशभक्तांची चौथी पिढी आजही ठाण्यात वास्तव्यास आहे.
  • संपूर्ण ठाणेकरांच्या भावना निगडित असलेल्या या अशोकस्तंभाला 1983च्या दरम्यान एका अवजड वाहनाने धडक दिली. यात तो उद्ध्वस्त झाला. त्यानंतर, आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर, भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात त्या स्तंभाचे काम सुरू आहे.

मतदारांच्या मदतीसाठी ‘1950’ हेल्पलाइन कार्यान्वित:

  • लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘1950’ ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइनअंतर्गत मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे.
  • चोवीस तास सुरू असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यांत कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जात आहे.
  • आचारसंहिता लागल्याच्या दिवसापासून या हेल्पलाइनवर लोकांकडून दररोज विचारणा केली जात आहे. यात मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. या हेल्पलाइनमुळे मतदार नावनोंदणीसाठी अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे.
  • मतदार यादीतील मतदाराच्या वैयक्तिक माहितीचे तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाईल ॲप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येत असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

दिनविशेष:

  • 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन‘ आहे.
  • यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म 22 मार्च 1924 मध्ये झाला होता.
  • सन 1945 मध्ये अरब लीगची स्थापना झाली.
  • हमीद दलवाई यांनी 1970 यावर्षी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
  • सन 1999 मध्ये लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago