22 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 मे 2020)
रेल्वे स्थानकांवर आरक्षित तिकीट उपलब्ध :
- करोनामुळे स्थगित झालेली प्रवासी रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांमध्ये रेल्वेची संख्या वाढवली जाईल.
- तसेच, दोन-तीन दिवसांमध्ये रेल्वे स्टेशनांमधील तिकीट खिडक्यांवरही रेल्वेचे आरक्षण करता येऊ शकेल.
- शिवाय, देशभरातील 1.7 लाख सार्वजनिक सेवा केंद्रांवरही रेल्वेचे तिकीट मिळू शकेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
- करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा 24 मार्चपासून बंद करण्यात आली होती. आता टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यामध्ये ती टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
- 1 जूनपासून १००100 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे गंतव्य स्थानकांवरून मूळ स्थानकांवर परत येतील. त्यामुळे एक रेल्वे दोन फेऱ्या करेल. अशा 200 रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
- तर या गाडय़ांसाठी ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षणाची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):
हर्षवर्धन आज ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार :
- जागतिक आरोग्य संघटनेमध्ये (डब्ल्यूएचओ) भारत आता महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.
- भारताच्या करोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे आज डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
- तर जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे सध्या डब्ल्यूएचओच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
- तसेच कार्यकारी मंडळावर भारताचा प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर 194 देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पदभार स्वीकारणार ही केवळ औपचारिकता आहे.
- डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व गटाने कार्यकारी मंडळावर मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या पुढील तीन वर्षांसाठी भारताची निवड करण्याचा निर्णय गेल्या वर्षी एकमताने घेतला.
दिनविशेष :
- 22 मे : जागतिक जैवाविविधता दिन.
- समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा 22 मे 1772 रोजी जन्म झाला.
- 22 मे 1762 मध्ये स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्ब्बुर्गचा तह झाला.
- राइट बंधूंनी उडणार्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट 22 मे 1906 मध्ये घेतले.
- विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म सन 1783 मध्ये 22 मे रोजी झाला.
- 22 मे 1972 रोजी सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
- भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी सूत्रे हाती घेतली.