22 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
22 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
Table of Contents
चालू घडामोडी (22 मे 2022)
उत्पादन शुल्ककपातीमुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त :
- भडकलेल्या इंधनदरामुळे महागाईचा चढता आलेख रोखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात मोठी कपात केली.
- पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे आठ रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क सहा रुपयांनी कमी करण्यात आले.
- इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला.
- सरकार गॅस सिलिंडरसाठी 200 रुपयांचे अनुदान देणार असून त्याचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना होईल, असेही सीतारामन म्हणाल्या.
- देशाचे आयात अवलंबित्व अधिक असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी सरकार कच्चा माल आणि मध्यस्थांवरील सीमा शुल्कही कमी करीत आहे.
- त्याचबरोबर लोखंड आणि पोलादाच्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्यात येईल.
Must Read (नक्की वाचा):
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धात भारतीय पुरुष कंपाऊंड संघाला सुवर्णपदक :
- भारतीय पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघाने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करत फ्रान्सला दोन गुणांनी पराभूत करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवले.
- तर मोहन भारद्वाजने वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
- विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील भारताची एकूण पदकसंख्या पाच झाली आहे.
- अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहानचा समावेश असलेल्या पुरुष कंपाऊंड संघाने जोरदार पुनरागमन करून फ्रान्सला 232-230 असे नमवत सुवर्णपदक मिळवले.
- मग कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्माने अवनीत कौरच्या साथीने भारताला दुसरे पदक मिळवून दिले.
- भारतीय जोडीने मिश्र सांघिक गटात तुर्कीच्या अमीरकान हाने आणि आयसे बेरा सुजेर जोडीला 156-155 असे नमवत कांस्यपदक मिळवले.
प्रज्ञानंदचा विश्वविजेत्या कार्लसनवर दुसऱ्यांदा विजय :
- भारताचा युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर वर्षभरात दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचा पराक्रम दाखवला आहे.
- प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत कार्लसनला नामोहरम केले.
- तीन महिन्यांपूर्वी प्रज्ञानंदने कालर्सनला प्रथमच हरवून सर्वाचे लक्ष वेधले होते.
- चीनचा वेई यि याने एकटय़ाने आघाडी घेतली असून कार्लसन दुसऱ्या स्थानावर आहे.
- फेब्रुवारीत झालेल्या एअरिथग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनला हरवून बुद्धिबळ जगताला धक्का दिला होता.
- कार्लसनला हरवणारा प्रज्ञानंद हा भारताचा तिसरा बुद्धिबळपटू ठरला होता.
दिनविशेष :
- 22 मे : जागतिक जैवाविविधता दिन.
- समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा 22 मे 1772 रोजी जन्म झाला.
- 22 मे 1762 मध्ये स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्ब्बुर्गचा तह झाला.
- राइट बंधूंनी उडणार्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट 22 मे 1906 मध्ये घेतले.
- विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म सन 1783 मध्ये 22 मे रोजी झाला.
- 22 मे 1972 रोजी सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
- भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी सूत्रे हाती घेतली.