22 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2019)
महिंदा राजपक्ष श्रीलंकेचे नवे पंतप्रधान :
- श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणून गोताबाया राजपक्ष यांची निवड झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू महिंदा राजपक्ष यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे श्रीलंकेतील राजकीय क्षेत्रावर शक्तिशाली आणि वादग्रस्त राजपक्षे घराण्याने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे बोलले जात आहे.
- तर महिंदा राजपक्ष यांना गोतबाया यांनी अध्यक्षीय सचिवालयात पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- तसेच ऑगस्ट 2020 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत महिंदा राजपक्ष काळजीवाहू मंत्रिमंडळाचे पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
भारताला अमेरिका देणार 13 तोफा :
- युद्धा नौका आणि लढाऊ विमानांवर हल्लाबोल करण्याची क्षमता असणाऱ्या एमके -45 या प्रकारच्या अत्याधुनिक तोफा येत्या काही महिन्यांमध्ये भारताच्या ताफ्यात असतील. अशा प्रकारच्या 13 तोफा भारताला विक्री करण्याच्या
व्यवहाराला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. - तर या 13 तोफांसाठी भारताला 7100 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. संरक्षण सौद्यांना मंजुरी देणाऱ्या अमेरिकेच्या संस्थेने याबाबत माहिती दिली.
- अमेरिकेच्या संरक्षण खात्याने नौदलाच्या ऑपरेशन्ससाठी या तोफांची निर्मिती केली आहे. त्याचे आधुनिक व्हर्जन भारताला मिळणार आहे. भारताला मिळणाऱ्या तोफांचा पुढचा भाग (बॅरेल) हा अपेक्षित लांबीपेक्षा अधिक असेल. या
तोफांसोबत भारताला त्यासाठी लागणारा दारूगोळा, इतर उपकरणेही विकली जाणार आहेत. - तसेच अमेरिका भारतीय सैनिकांना ही एमके 45 तोफ कशी चालवायची, याचेही प्रशिक्षण देणार आहे. या तोफा भारताला मिळाल्यानंतर नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या तोफा भारताच्या ताब्यात आल्यानंतर त्या ज्या युद्धनौकांवर लावल्या जातील त्यांना घेऊन अमेरिकेचे नौदल आणि इतर देशांचे नौदल विविध प्रकारचे सुरक्षा अभियान राबवू शकणार आहेत.
गुरुच्या चंद्रावर बाष्परुपात पाणी :
- आपल्या सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरुच्या युरोपा या उपग्रहावर पाणी असल्याचा दावा नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने केला आहे.
- तर नासाला संशोधनादरम्यान या उपग्रहावर पाण्याचे बाष्प आढळून आले आहेत. या दाव्यामुळे युरोपावर पाण्याचा मोठा स्त्रोत असलेला सुमद्रही अस्तित्वात असू शकतो असेही नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
- तसेच यामध्ये युरोपाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागावरुन अधूनमधून फवाऱ्यांप्रमाणे पाणी बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. याचे पुरावे संशोधकांना मिळाले असल्याचे नासाने म्हटले आहे.
- मात्र, या पाण्याचे मॉलेक्युलस मोजण्यात आलेले नसल्याने याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही. जीवसृष्टीसाठी लागणारे आवश्यक घटक या उपग्रहावर असू शकतात अशी शक्यता ताज्या संशोधनावरुन व्यक्त करण्यात आली आहे.
1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘वन नेशन,वन फास्टटॅग’ :
- महामार्गावरील टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबवर रांगामध्ये तिष्ठत प्रतिक्षा करण्याचे टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांसाठी ‘फास्टटॅग’ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आगावू स्वरुपात, ऑनलाईन, कॅशलेस टोल भरणाऱ्यांना वाहनांना स्वतंत्र मार्गिकेतून कसल्याही अडथळ्याविना बाहेर पडता येणार आहे.
- 1 नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जात असून येत्या 1 डिसेंबरपासून तो नियमित स्वरुपात कार्यान्वित केला जाणार आहे.
- ‘वन नेशन,वन फास्टटॅग’या तत्वानुसार राबविल्या जाणाऱ्या या अद्यावत सुविधेच्या वापरामुळे वाहनधारकांना वेळ, पैश्यांची मोठी बचत होणार असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
- तर त्याबाबत माहिती देताना प्राधीकरणाच्या विभागीय मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंग म्हणाले,‘ सर्व टोल नाक्यावर तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आणि विविध बॅँकांमध्ये ऑनलाईन रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
दिनविशेष:
- सन 1858 मध्ये कोलोराडो मधील ‘डेनव्हर शहराची स्थापना’ करण्यात आली.
- धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1880 मध्ये झाला होता.
- स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द.शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1909 मध्ये झाला.
- सन 1963 मध्ये ‘थुंबा‘ या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले.
- पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1968 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा