22 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2020)
ब्राझीलमध्ये मानवी लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू:
- ब्राझीलमध्ये मानवी लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे.
- अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले.
- स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असला तरी, लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे.
- ज्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, तो कंट्रोल ग्रुपचा भाग होता. त्याला मेनिनजायटिसची लस देण्यात आली होती.
- स्वयंसेवकाला ट्रायल व्हॅक्सीन न देता प्लेसीबो देण्यात आले होते, असे ओ ग्लोबो या ब्राझीलियन वर्तमानपत्राने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले:
- नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत.
- हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.
- दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले.
- तेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत.
- बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.
बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडचे विजय- चॅम्पियन्स लीग फुटबॉल :
- लिओनेस मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केल्यानंतर बार्सिलोनाने जोरदार ‘गोलधडाका’ सुरू केला. त्यामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने बुधवारी हंगेरीच्या फेरेन्कवारोस संघाचा 5-1 असा धुव्वा उडवला.
- मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस या संघांनी आपापले सामने जिंकले.
- मेसीने 27व्या मिनिटाला पेनल्टीवर बार्सिलोनाचे खाते खोलले, त्यानंतर अन्सू फाटी, फिलिपे कुटिन्हो, प्रेडी आणि औसमाने डेम्बेले यांनी गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
- मेसीने चॅम्पियन्स लीगमधील 116व्या गोलची नोंद केली. सलग १६ मोसमांत किमान एक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
दिनविशेष :
- 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन
- 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
- 22 ऑक्टोबर 4004 मध्ये ई. पू. उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
- निकोला टेस्ला यांनी 22 ऑक्टोबर 1927 मध्ये सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
- पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर 1963 मध्ये भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
- 22 ऑक्टोबर 2008 मध्ये भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले.