22 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

मिताली राज
मिताली राज

22 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2021)

कोव्हॅक्सिनच्या मुलांवरील चाचण्या पूर्ण :

  • भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या मुलांवरील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
  • अठरा वर्षांखालील मुलांवर या चाचण्या घेण्यात आल्या असून त्याची माहिती पुढील आठवड्यात भारताच्या महाऔषध नियंत्रकांना सादर करण्यात येणार आहे, असे भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी सांगितले.
  • तर त्यापुढच्या टप्प्यात नाकावाटे देण्याच्या लशीच्या चाचण्या केल्या जात असून या लशीमुळे नाकातच करोनाच्या विषाणूला प्रतिकारशक्ती प्रणालीच्या मदतीने प्रतिकार केला जाईल. त्यातून करोनाचा संसर्ग, प्रसार यापासून संरक्षण मिळेल.
  • भारत बायोटेकने इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि हेस्टर बायोसायन्सेस या कंपन्यांशी कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादनासाठी करार केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली राजने रचला इतिहास :

  • भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हारुप पार्क मैदानावर खेळला जात आहे.
  • तर या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने 61 धावांची खेळी खेळली.
  • तसेच या खेळादरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील 20,000 धावांचा टप्पा पार केला.
  • तसेच, मिताली राजचे एकदिवसीय सामन्यातील सलग पाचवे अर्धशतक आहे.
  • मितालीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार अर्धशतके केली होती आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही मितालीने अर्धशतक केले आहे.

कॅनडातील निवडणुकीत त्रुदो यांचा विजय :

  • कॅनडातील संसदीय निवडणुकीत सोमवारी पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांच्या लिबरल पक्षाला विजय मिळाला असून बहुमत मात्र हुकले आहे.
  • लिबरल्सला तुलनेने जास्त जागा मिळाल्या असून लिबरल पक्षाचे नेतृत्व करताना त्रुदो यांनी दोन निवडणुकांत विजय संपादन केला आहे.
  • तसेच त्रुदो यांच्या लिबरल पक्षाचे उमेदवार 156 जागांवर आघाडीवर आहेत.
  • तर बहुमतासाठी 170 जागा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मिळणे अपेक्षित असताना त्यांना त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

NDA मध्ये महिलांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू :

  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) द्वार मुलींसाठी खुले केलेले आहे.
  • तर या संधीपासून मुलींना वंचित ठेवणाऱ्या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिलेली. याबाबतची अधिसूचना प्रसृत करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) दिले होते.
  • त्यानंतर आता याबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. NDA मध्ये प्रवेशासाठी आता महिला व मुलींना मे-2022 मध्ये होणारी प्रवेश परीक्षा देता येणार आहे.
  • महिला व मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी करण्यात यावं, यासाठी दाखल केल्या गेलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आझ केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून, वरील माहिती देण्यात आली.

दिनविशेष:

  • सन 1660 मध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
  • सन 1888 मध्ये द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • सन 1995 मध्ये भारतीय नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • सुनील गावसकर यांना सन 1998 मध्ये महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर झाला.
  • सन 2003 मध्ये नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.