23 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
23 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 जून 2020)
आणखी एक औषध भारतात होणार उपलब्ध:
- भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी सिप्लाने ‘सिप्रेमी’ हे औषध लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. ‘सिप्रेमी’ हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे जेनेरिक व्हर्जन आहे.
- भारतात रेमडेसिवीर हे औषध सिप्रेमी या ब्रँण्डनेमखाली उपलब्ध होणार आहे.
- ग्लेनमार्कच्य फॅबीफ्ल्यू आणि हिटेरोज कोविफॉर पाठोपाठ आता सिप्रेमी हे अॅंटिव्हायरल औषध सुद्धा करोनावरील उपचारासाठी उपब्ध होणार आहे.
- मागच्या आठवडयात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इर्मजन्सीमध्ये रेमडेसिवीर हे औषध वापरायला परवानगी दिली.
- भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे.
- अमेरिकेत करोना रुग्णांवर उपचारामध्ये रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरल्याचे दिसले आहे.
- सिप्रेमीची भारतात किती किंमत असेल ते अजून सिप्लाने जाहीर केलेले नाही.
- हे औषध कसे द्यायचे त्यासंबंधी सिप्ला प्रशिक्षणही देणार आहे. रेमडेसिवीरचे जेनेरिक व्हर्जन आणत असल्याचे जाहीर केल्यानंतर सिप्लाच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली.
Must Read (नक्की वाचा):
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला:
- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
- १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्याने मार्केट कॅपमध्येही वाढ होत आहे.
- बीएसईमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 28,248.97 कोटी रुपयांनी वाढून 11,43,667 कोटी (150 अब्ज डॉलर्स) रुपये झाले.
- सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर बीएसईमध्ये रिलायन्सच्या शेअर्सनी 2.53 टक्क्यांची उसळी घेत 1804.10 रुपयांचा विक्रमी स्तर गाठला.
- तर, एनएसईमध्येही कंपनीच्या शेअर्सनी 2.54 टक्क्यांनी उसळी घेत 1804.20 रुपयांचा स्तर गाठला.
- यापूर्वी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केल्याचे जाहीर केले.
- अंबानी यांनी रिलायन्सच्या ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समुहावरील कर्ज मार्च 2021 पर्यंत फेडण्याचे आश्वासन भागधारकांना दिले होते.
- मात्र 10 महिन्यांतच ते फेडण्यात आले असून त्यासाठी प्रत्यक्ष निधी उभारणी अवघ्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण झाली आहे.
- गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली.
- ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत 24.70 टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं 1.6 लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.
न्यू यॉर्कमधला रुझवेल्ट यांचा पुतळा हटवणार:
- अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या बाहेर असलेला अमेरिकेचे माजी अध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांचा पुतळा हटवण्यात येणार आहे.
- पोलिसांच्या कारवाईत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूच्या निषेधार्थ अमेरिकेत सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संग्रहालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.
- ‘गेल्या काही आठड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे वंशवादाचे शक्तिशाली आणि हानिकारक प्रतीक म्हणून पुतळे आणि स्मारके असल्याचं समोर आलं आहे.
- संग्रहालयाच्या अधिकार्यांनी या स्मारकाच्या विवादास्पद स्वरूपाचा उल्लेख करताना यामध्ये ‘एक व्यक्ती घोडाच्या पाठीवर बसलीये तर अन्य त्यामागे पायपीट करत आहेत’, असं नमूद केलं आहे.
- पुतळा केव्हा हटवला जाईल याबाबतची नेमकी माहिती संग्रहालयाकडून देण्यात आलेली नाही. पण, पुतळा वर्णद्वेषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
- दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुतळा हटवण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
- रविवारी न्यू यॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी “समस्याग्रस्त” स्मारक काढून टाकण्याच्या संग्रहालयाच्या विनंतीचे समर्थन करतो असे निवेदनात म्हटले आहे.
- थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होण्यापूर्वी न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते.
- तर, रूझवेल्ट यांचे वडील न्यू यॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या संस्थापकांपैकी एक होते.
- थिओडोर रुझवेल्ट (1858-1919) हे एक निसर्गसंपन्न आणि नैसर्गिक इतिहासाचे लेखक होते, त्यामुळे हा पुतळा त्यांच्या आठवणीत उभारण्यात आला होता.
भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे कर्करोगाने निधन:
- भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे (लग्नापूर्वीची पूर्णिमा गव्हाणे) हिचे वयाच्या ४२व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे.
- आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाची मान्यताप्राप्त प्रशिक्षक असलेली पूर्णिमा गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती.
- पूर्णिमाने आयएसएसएफ विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
- नांदेड येथे जन्मलेल्या पूर्णिमाने मुंबईतून आपल्या नेमबाजी कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिला शिवछत्रपती पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
- १० मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विक्रमाचीही तिने नोंद केली होती. निवृत्तीनंतर पूर्णिमाने श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.
करोनाबाबतच्या ‘या’ मेलवर करु नका क्लिक:
- एसबीआयचा लाखो ग्राहकांसाठी Alert, करोनाबाबतच्या ‘या’ मेलवर चुकूनही करु नका क्लिक.
- एसबीआयने त्यांच्या खातेधारकांना संभाव्य सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे.
- ‘फ्री कोविड19 टेस्टिंग’च्या नावाखाली फेक ईमेल, सोशल मीडिया पोस्ट्स किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे ग्राहकांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशारा बँकेने दिला आहे.
- तर दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथील ग्राहकांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत.
- “21 जूनपासून देशातील काही मुख्य शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला CERT-In कडून मिळाली आहे.
- यासाठी ncov2019@gov.in या ईमेल आयडीद्वारे ‘फ्री कोविड19 टेस्टिंग’बाबतचा मेल पाठवला जाऊ शकतो.
- त्यामुळे ग्राहकांनी ncov2019@gov.in मेल आयडीवरुन आलेल्या मेलवर क्लिक करु नये”, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.
- “सायबर गुन्हेगारांकडे जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल आयडी आहेत.
- त्या सर्व इमेल आयडीवर सायबर हल्लेखोर ‘Free Covid-19 Testing’ या विषयाचा मेल पाठवू शकतात.
- कोव्हिड-19 च्या नावाखाली बनावट इमेल पाठवून त्याद्वारे हे सायबर हल्लेखोर लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरी करत आहेत. त्यामुळे सावध राहा”, अशा इशारा एसबीआयने दिला आहे.
दिनविशेष :
- 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
- क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
- 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
- भारतीय क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
- भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.