Current Affairs (चालू घडामोडी)

23 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक पुस्तक दिन

23 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 एप्रिल 2020)

इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात :

  • अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.
  • तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही. रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’असे आहे.
  • तसेच इराणने जो उपग्रह सोडला आहे तो 425 कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.
  • इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.

भारतीय कंपनीने बनवला कार्डबोर्डचा बेड :

  • करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील 180 हून अधिक देशामध्ये झाला आहे. जगभरातील अनेक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.
  • तर आरोग्य सेवेवर ताण पडताना दिसत असून अनेक ठिकाणी पीपीई किट्स (पर्सल प्रोटेकटीव्ह इक्वीपमेंट), मास्क, व्हेंटीलेटर्स आणि बेड्सचा तुटवडा जाणावर आहेत.
  • परदेशातील परिस्थितीचा अंदाज घेत भारतामधील एका कंपनीने स्वस्त बेडची निर्मिती केली आहे. गुजरातमधील वापी येथील आर्यन पेपर (Aryan Paper) कंपनीने फोल्ड होणारा आणि पूर्णपणे कार्डबोर्डपासून बनवलेल्या बेडची निर्मिती केली आहे.
  • तसेच कार्डबोर्डपासून बनवल्यामुळे हा बेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि तो तयार करणे अगदीच सोप्पे आहे. भविष्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये बेडचा तुटवडा निर्माण झाल्यास या बेडचा वापर करणे शक्य होणार आहे.
  • तर या बेडचे वजन 10 किलोपेक्षा कमी आहे. असं असलं तरी या बेडवर 200 किलोपर्यंतचे वजन ठेवता येऊ शकते असं कंपनीने म्हटलं आहे.
  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा बेड वापरण्यात येण्याची शक्यता असल्याने या बेडवर विशेष प्रकारच्या रसायनांचे कोटींग करण्यात आलं असून त्यामुळे हा बेड सहज ओला होणार नाही. म्हणजेच एखादा द्रव पदार्थ सांडल्यास किंवा बेडच्या संपर्कात आल्यास, बेडच्या रचनेवर काही विशेष फरक पडणार नाही.
  • हा बेड तयार करण्यासाठी कोणतीही हत्यारे लागत नाही हेही या बेडचे वैशिष्ट्य आहे. शाळेमध्ये एखाद्या प्रोजेक्टदरम्यान जसं खाच्यांमध्ये अडकवून एखादे मॉडेल तयार केले जाते त्याचप्रमाणे हा बेड उभारता येतो. अवघ्या काही मिनिटांमध्ये कोणत्याही समजदार व्यक्तीला हा बेड तयार करता येईल इतके सोपे तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आलं आहे.
  • तर हा बेड पर्यावरणपुरक आहे. म्हणजेच वापर झाल्यानंतर किंवा अती वापरामुळे खराब झाल्यास हा कार्डबोर्डने बनवला असल्याने त्याचे विघटन होते आणि त्यामुळे घन कचऱ्याची निर्मिती होत नाही.
  • या बेडची किंमत 900 ते हजार रुपयांदरम्यान असून बेडच्या डिलेव्हरीचे वेगळे शुल्क कंपनीकडून आकारले जाईल असं सांगण्यात येत आहे. सध्या हे बेड गुजरात सरकार, मुंबई महानगरपालिका आणि भारतीय नौदलाला पुरवले जात आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 एप्रिल 2020)

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर अजामीनपत्र गुन्हा आणि दोन लाखापर्यंतचा दंड :

  • डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
  • डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
  • तसंच दोन लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
  • Epidemic Diseases Act, 1897 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तसेच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि 50 हजार ते 5 लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येईल असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

सिंधू ‘बीडब्ल्यूएफ’ची सदिच्छादूत :

  • जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) ‘मी बॅडमिंटन’ मोहिमेची जागतिक सदिच्छादूत म्हणून भारताची अव्वल खेळाडू पी. व्हीसिंधू हिची निवड करण्यात आली आहे.
  • तर बॅडमिंटन या खेळाविषयी असणारे प्रेम आणि आदर खेळाडूने या मोहिमेद्वारे व्यक्त करावा, असा उद्देश आहे.
  • अखंडता आणि प्रामाणिकपणा यांना अनुसरून ‘बीडब्ल्यूएफ’कडून पाच वर्षांपासून खेळाडूंना धडे दिले जात आहेत.

दक्षिण कोरियन कंपनी भारतात आठवडयाला बनवणार पाच लाख रॅपिड टेस्टिंग किटस :

  • करोना व्हायरसची जलदतगतीने चाचणी करण्यासाठी दक्षिण कोरिया स्थित कंपनी हरयाणा मानेसरमध्ये रॅपिड टेस्टिंग किटसची निर्मिती करणार आहे. दक्षिण कोरियातील भारतीय दूतावासाने मंगळवारी टि्वट करुन ही माहिती दिली.
  • तर चीनमधून मागवण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष निघाले आहेत. तीन राज्यांनी या किटसबद्दल तक्रारी केल्या आहेत.
  • दक्षिण कोरियाने सर्वाधिक चाचण्या करुनच करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले.

HDFC ने व्याजदरात केली कपात :

  • एचडीएफसीने खातेधारकांना लॉकडाउन दरम्यान गुड न्यूज दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केली आहे. नवे दर आजपासून म्हणजे 22 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.
  • करोना संकटामुळे मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर अन्य बँकाही व्याज दरांमध्ये कपात करत आहेत.
  • तर मंगळवारी एचडीएफसीने हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) 0.15% कपात करण्याचे जाहीर केले.
  • तसेच एचडीएफसीने, गृह कर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केल्याने नवे व्याजदर आता 8.05% ते 8.85% दरम्यान असतील.

अमेरिकेत साठ दिवस नवीन ग्रीनकार्ड देण्यावर बंदी :

  • करोना विषाणूच्या प्रसारानंतर अमेरिकेतील अनेक लोकांचे रोजगार गेले असून स्वदेशी लोकांचे उर्वरित रोजगार वाचवण्यासाठी स्थलांतरबंदी लागू करण्याचा इरादा मंगळवारी जाहीर केल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील साठ दिवसात कुणालाही ग्रीनकार्ड जारी करू नये, असा आदेश जारी केला आहे.
  • तर स्थलांतर बंदीच्याच प्रस्तावाचा हा एक भाग मानला जात आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी असे म्हटले होते की, स्थलांतर बंदी आदेशाचा परिणाम जे लोक तात्पुरते अमेरिकेत येणार आहेत त्यांच्यावर होणार नाही. सध्याच्या कायद्यानुसार दरवर्षी अमेरिका प्रत्येक देशाला 1 लाख 40हजार ग्रीनकार्ड हे रोजगारावर आधारित जारी करीत असते.
  • भारतीय व्यावसायिकात लोकप्रिय असलेला एच 1 बी व्हिसा देण्यावर आताच्या आदेशाचा परिणाम होणार नाही असे मानले जात आहे.
  • तसेच मोसमी स्थलांतरित कामगारांना कृषी कामांसाठी दिल्या जाणाऱ्या व्हिसावरही काही परिणाम होणार नाही.

पश्चिम रेल्वेने बनविले इनट्यूबेशन बॉक्स :

  • कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आयसोलेशन कक्ष तयार करत आहे. यासह मास्क, सॅनिटायझर, नॉन-कॉन्टॅक्ट वाटर कॅप बनवित आहे.
  • त्याप्रमाणे आता पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी इनटयूबेशन बॉक्स तयार केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी या बॉक्सचा वापर केला जातो.
  • तर रुग्णांच्या डोक्याकडील भाग या बॉक्समध्ये टाकण्यासाठी वक्रकार आकार आहे. या बॉक्सला दोन होल आहेत. या होलातून वैद्यकीय कर्मचारी हात घालून उपचार करू शकतो. परिणामी, रुग्णाची तपासणी करताना, व्हेंटिलेटर लावताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा थेट संबंध या बॉक्समुळे टाळता येणार आहे.
  • त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य होणार होणार आहे. या बॉक्सचा आकार 30 बाय 24 बाय 20 असा आहे. हा बॉक्स पारदर्शी असून 2 ते 3 किग्रचा आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

दिनविशेष :

  • 23 एप्रिलजागतिक पुस्तक दिन
  • 23 एप्रिल 1995 मध्ये जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
  • सन 1635 मध्ये 23 एप्रिल रोजी अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
  • समाजसुधारक ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला.
  • अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी झाला.
  • सन 1990 मध्ये नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 एप्रिल 2020)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago