23 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय शेतकरी दिवस
राष्ट्रीय शेतकरी दिवस

23 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2022)

प्रवीण बांदेकरांच्या कादंबरीला साहित्य अकादमी :

  • साहित्य अकादमीच्या यंदाच्या साहित्य पुरस्कारासाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीची निवड करण्यात आली.
  • एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या सोहळय़ात पुरस्कार प्रदान केले जातील.
  • बांदेकर यांच्यासह प्रमोद मुजुमदार यांना काश्मीरबाबतच्या ‘सलोख्याचे प्रदेश-शोध सहिष्णू भारताचा’, या ज्येष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या ‘इन गुड फेथ’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाला.
  • साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 23 भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन नाटके, दोन टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी एक आत्मकथन, लेखसंग्रह आणि ऐतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आली.
  • ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि प्राध्यापक नितीन रिंढे यांच्या समितीने मराठी पुस्तकांची निवड केली.

इंग्लंडमध्ये आता रजोनिवृत्तीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे :

  • रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील काम करणाऱ्या इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेतील महिला कर्मचारी यापुढे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार घरून काम करू शकणार आहेत.
  • तेथील आरोग्य सेवेच्या प्रमुख अमॅण्डा प्रिचर्ड यांनी प्रथमच रजोनिवृत्तीसंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • ती जारी करताना अन्य कर्मचाऱ्यांनी रजोनिवृत्तीला आलेल्या महिलांची अशाही परिस्थितीत प्रगती होण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे, असे म्हटले आहे.
  • या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयुष्यातल्या या टप्प्यातून जाणाऱ्या महिलांना तुलनेने सहजसोपी, ताण न येणारी कामे दिली जातील आणि त्यांना लवचिक कार्यपद्धतीचाही लाभ मिळेल.
  • अशा महिलांच्या कामकाजामध्ये योग्य त्या तडजोडी, बदल करण्याबाबत एनएचएस मार्गदर्शक तत्त्वांमधे नमूद करण्यात आले आहे.

भारताचे महान क्रिकेटपटू विनू मांकड यांचा मोडला विक्रम :

  • भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी मिरपूरमध्ये सुरू झाला.
  • भारताच्या भेगत गोलंदाजीपुठे बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 227 धावांवर गुंडाळला गेला.
  • याच दुसऱ्या कसोटी दरम्यान भारताची विदर्भ एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या वेगवान गोलंदाज उमेश यादवने महान खेळाडू विनू मांकड यांचा विक्रम मोडला.
  • बांगलादेशविरुद्ध मिरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज उमेश यादवने शानदार गोलंदाजी करत इतिहास रचला.
  • उमेशने महान विनू मांकड यांना मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तेराव्या स्थानावर पोहोचला आहे.
  • उमेशच्या नावावर आता 54 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 163 बळी आहेत.
  • तर मंकडच्या नावावर 44 सामन्यांत 162 विकेट्स आहेत.

मेस्सीला मिळणार मोठा सन्मान:

  • तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनाने अखेर फुटबॉलचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले.
  • अर्जेंटिना सरकार आपल्या नोटेवर मेस्सीचे चित्र लावण्याच्या विचारात आहे.
  • विश्वचषकात मिळालेले यश लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल.
  • उल्लेखनीय आहे की अर्जेंटिनाने 1978 मध्ये पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मारक नाणीही जारी करण्यात आली होती.

भारतीय महिला हॉकी संघाची जागतिक यशाला गवसणी :

  • भारतीय महिला हॉकी खेळाडूंनी FIH नेशन्स कप (FIH Nations Cup) जिंकला.
  • जगभरात FIFA च्या फायनलची धूम सुरु असताना आपल्या या खेळाडूंनी स्पेनच्या खेळाडूंचा अंतिम फेरीत पराभव केला आणि हॉकी जगतातील एक मानाचा चषक आपल्या देशासाठी जिंकला.
  • इतकंच नाही तर या विजयामुळे भारतीय महिला हॉकी टीमनं 2023-24 च्या प्रो- लीगमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे.

जयदेव उनाडकटने रचला मोठा विक्रम:

  • भारत आणि बांगलादेश हा सामना ढाका येथील क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे.
  • या सामन्यासाठी जयदेव उनाडकटचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाआहे.
  • तसेच उनाडकटने या सामन्यात एक मोठा विक्रमही केला आहे.
  • आता तो एका कसोटी पासून दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सर्वात जास्त सामन्यांना मुकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • त्याने शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता तो 2022 मध्ये खेळत आहे.
  • अशा स्थितीत या 12 वर्षात त्याने एकूण 118 कसोटी सामन्यांना मुकला आहे.

दिनविशेष :

  • 23 डिसेंबरराष्ट्रीय शेतकरी दिवस
  • 23 डिसेंबर 1690 मध्ये मणिपूर साम्राज्याचे सम्राट ‘पामेबा’ यांचा जन्म झाला.
  • सन 1940 मध्ये 23 डिसेंबर रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
  • ‘बिजन कुमार मुखरेजा’ यांनी 23 डिसेंबर 1954 मध्ये भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 23 डिसेंबर 2000 मध्ये केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास मंजुरी दिली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.