23 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 डिसेंबर 2022)
प्रवीण बांदेकरांच्या कादंबरीला साहित्य अकादमी :
साहित्य अकादमीच्या यंदाच्या साहित्य पुरस्कारासाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीची निवड करण्यात आली.
एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या सोहळय़ात पुरस्कार प्रदान केले जातील.
बांदेकर यांच्यासह प्रमोद मुजुमदार यांना काश्मीरबाबतच्या ‘सलोख्याचे प्रदेश-शोध सहिष्णू भारताचा’, या ज्येष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या ‘इन गुड फेथ’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाला.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 23 भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन नाटके, दोन टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी एक आत्मकथन, लेखसंग्रह आणि ऐतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आली.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि प्राध्यापक नितीन रिंढे यांच्या समितीने मराठी पुस्तकांची निवड केली.
इंग्लंडमध्ये आता रजोनिवृत्तीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे :
रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील काम करणाऱ्या इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेतील महिला कर्मचारी यापुढे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार घरून काम करू शकणार आहेत.
तेथील आरोग्य सेवेच्या प्रमुख अमॅण्डा प्रिचर्ड यांनी प्रथमच रजोनिवृत्तीसंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
ती जारी करताना अन्य कर्मचाऱ्यांनी रजोनिवृत्तीला आलेल्या महिलांची अशाही परिस्थितीत प्रगती होण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे, असे म्हटले आहे.
या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयुष्यातल्या या टप्प्यातून जाणाऱ्या महिलांना तुलनेने सहजसोपी, ताण न येणारी कामे दिली जातील आणि त्यांना लवचिक कार्यपद्धतीचाही लाभ मिळेल.
अशा महिलांच्या कामकाजामध्ये योग्य त्या तडजोडी, बदल करण्याबाबत एनएचएस मार्गदर्शक तत्त्वांमधे नमूद करण्यात आले आहे.
भारताचे महान क्रिकेटपटू विनू मांकड यांचा मोडला विक्रम :
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी मिरपूरमध्ये सुरू झाला.
भारताच्या भेगत गोलंदाजीपुठे बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 227 धावांवर गुंडाळला गेला.
याच दुसऱ्या कसोटी दरम्यान भारताची विदर्भ एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या वेगवान गोलंदाज उमेश यादवने महान खेळाडू विनू मांकड यांचा विक्रम मोडला.
बांगलादेशविरुद्ध मिरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज उमेश यादवने शानदार गोलंदाजी करत इतिहास रचला.
उमेशने महान विनू मांकड यांना मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तेराव्या स्थानावर पोहोचला आहे.
उमेशच्या नावावर आता 54 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 163 बळी आहेत.
तर मंकडच्या नावावर 44 सामन्यांत 162 विकेट्स आहेत.
मेस्सीला मिळणार मोठा सन्मान:
तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनाने अखेर फुटबॉलचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले.
अर्जेंटिना सरकार आपल्या नोटेवर मेस्सीचे चित्र लावण्याच्या विचारात आहे.
विश्वचषकात मिळालेले यश लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल.
उल्लेखनीय आहे की अर्जेंटिनाने 1978 मध्ये पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मारक नाणीही जारी करण्यात आली होती.
भारतीय महिला हॉकी संघाची जागतिक यशाला गवसणी :
भारतीय महिला हॉकी खेळाडूंनी FIH नेशन्स कप (FIH Nations Cup) जिंकला.
जगभरात FIFA च्या फायनलची धूम सुरु असताना आपल्या या खेळाडूंनी स्पेनच्या खेळाडूंचा अंतिम फेरीत पराभव केला आणि हॉकी जगतातील एक मानाचा चषक आपल्या देशासाठी जिंकला.
इतकंच नाही तर या विजयामुळे भारतीय महिला हॉकी टीमनं 2023-24 च्या प्रो- लीगमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे.
जयदेव उनाडकटने रचला मोठा विक्रम:
भारत आणि बांगलादेश हा सामना ढाका येथील क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे.
या सामन्यासाठी जयदेव उनाडकटचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाआहे.
तसेच उनाडकटने या सामन्यात एक मोठा विक्रमही केला आहे.
आता तो एका कसोटी पासून दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सर्वात जास्त सामन्यांना मुकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
त्याने शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता तो 2022 मध्ये खेळत आहे.
अशा स्थितीत या 12 वर्षात त्याने एकूण 118 कसोटी सामन्यांना मुकला आहे.
दिनविशेष :
23 डिसेंबर – राष्ट्रीय शेतकरी दिवस
23 डिसेंबर 1690 मध्ये मणिपूर साम्राज्याचे सम्राट ‘पामेबा’ यांचा जन्म झाला.
सन 1940 मध्ये 23 डिसेंबर रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
‘बिजन कुमार मुखरेजा’ यांनी 23 डिसेंबर 1954 मध्ये भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
23 डिसेंबर 2000 मध्ये केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास मंजुरी दिली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.