23 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2019)
शिक्षकांनाही लागू होणार सातवा वेतन आयोग:
- अनुदानित खासगी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा सरकारचा निर्णय 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. त्यानुसार सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना एकाच वेळी सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
- वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी, तर कधी आठ महिन्यांनी लाभ मिळत असे. यंदा पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.
- तर या आदेशामुळे राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळेल.
Must Read (नक्की वाचा):
‘व्हॉट्सअॅप’वर आक्षेपार्ह संदेशांबाबत तक्रारीची सुविधा:
- व्हॉट्सअॅपवर कुणी आक्षेपार्ह संदेश पाठवला तर आता दूरसंचार खात्याकडे त्याची तक्रार करता येणार आहे, असे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी ज्याला असा संदेश आला आहे त्याने मोबाईल नंबर व संदेशाचा स्क्रीनशॉट ही माहिती ई-मेलद्वारे ccaddn-dot@nic.in.या पत्त्यावर पाठवायची आहे.
- जर कुणाला शिवीगाळ करणारा, धमक्या देणारा किंवा अश्लिल व्हॉट्सअॅप संदेश आला तर त्यात स्क्रीन शॉट घेऊन माहिती द्यावी लागणार आहे.
- दूरसंचार खात्याचे नियंत्रक आशिष जोशी यांनी सांगितले की, या तक्रारी दूरसंचार सेवापुरवठादार व पोलीस प्रमुख यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात येतील.
- काही पत्रकार, इतर व्यक्ती यांना आक्षेपार्ह संदेश नेहमीच येत असतात त्यात धमक्याही दिलेल्या असतात. त्यामुळे तक्रार करण्याची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश 19 फेब्रुवारीला जारी करण्यात आला.
- आक्षेपार्ह संदेशांबाबत तक्रार आल्यावर दूरसंचार सेवा पुरवठादारांनी याबाबत त्यांच्या संबंधित ग्राहकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, कारण ग्राहकांनी अर्जात भरून दिलेल्या ग्राहक जाहीरनाम्याचे ते उल्लंघन आहे.
अनारक्षित रेल्वे तिकीट आता ऑनलाइन:
- सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांना आता यूटीएस या मोबाईल ॲपद्वारे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे.
- एक नोव्हेंबर 2018 पासून ही सुविधा देशभर सुरू करण्यात आली असून, ऐन उन्हाळ्यात तिकिटासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्यापासून आता प्रवाशांची सुटका होणार आहे.
- स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची भली मोठी रांग आणि रेल्वे सुटण्याची वेळ, अपुऱ्या तिकीट खिडक्या अन् कमी मनुष्यबळ, रेल्वे डब्यात जागा मिळते की नाही याची धाकधूक आदींपासून आता प्रवाशांची सुटका होणार आहे.
- नेटवर्क डाऊन, प्रवाशांमधील भीती, ॲपबद्दल माहिती नाही, यासह अन्य कारणांमुळे प्रवाशी अजूनही रांगेत उभे राहूनच तिकीट काढतात; परंतु आता रांगेत उभे न राहता रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटर परिसरात अनारक्षित तिकीट काढता येणार आहे.
- उन्हाळ्यातील सुट्ट्यांमुळे रेल्वेच्या प्रवाशांची संख्या वाढते. त्या पार्श्वभूमीवर हे ॲप अद्ययावत करण्यात आल्याने तत्काळ ऑनलाइन तिकीट उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान:
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर आहेत. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- नरेंद्र मोदींनी पुरस्कारासोबत 1 कोटी 30 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
- गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी, वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळाची स्थापना:
- राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत.
- तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल.
- तर याशिवाय विविध 14 विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
दिनविशेष:
- सन 1455 या वर्षी पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले होते.
- देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला होता.
- सन 1947 मध्ये आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना झाली.
- संसदेने सन 1952 मध्ये कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
- कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ सन 1996 मध्ये झाला.