23 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

मोहम्मद शमी
मोहम्मद शमी

23 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जानेवारी 2023)

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा:

  • सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
  • उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्काराबाबतची माहिती देण्यात आली आहे.
  • विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
  • आरोग्य सेवा प्रभावीपणे देणे, आरोग्य उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या उद्देशाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.

फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्षे:

  • फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने नवी ‘निवृत्तिवेतन योजना’ तयार केली असून या योजनेमध्ये निवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्षे करण्यात आले आहे.
  • त्याशिवाय संपूर्ण निवृत्तिवेतनासाठी आवश्यक सेवाकाळाचा अवधीही वाढविला आहे.
  • फ्रान्सच्या नागरिकांचा या योजनेला तीव्र विरोध असून त्याविरोधात जनआंदोलन उसळले आहे.
  • फ्रान्स सरकारने निवृत्तिवेतन कायद्यात सुधारणा केली असून नवी निवृत्तिवेतन योजना तयार केली आहे.

मोहम्मद शमीने रचला नवा विक्रम:

  • टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
  • दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या संघाने न्यूझीलंडला अवघ्या 108 धावांत गुंडाळले.
  • टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या वनडेत शानदार गोलंदाजी केली.
  • त्याने न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना पॅव्हेलियमध्ये पाठवले.
  • 3 विकेट्ससह,शमीने आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली.
  • हे करत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक वेळा 3 विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.
  • अजित आगरकरने टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 3 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
  • जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानावर आहे. झहीर खान तिसऱ्या स्थानावर आहे.
  • मोहम्मद शमी आणि अनिल कुंबळे यांनी 29 वेळा ही कामगिरी केली आहे.

टीम इंडिया ठरला जगातील पहिलाच देश:

  • भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे.
  • हा सामना खेळण्यासाठी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर उतरताच भारताने एक नवा किर्तीमान निर्माण केला.
  • कारण भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे,ज्याने वेगवेगळ्या 50 क्रिकेट स्टेडियमवर वनडे सामने आयोजित करण्याचा पराक्रम केला आहे.
  • भारत हा जगातील पहिला देश आहे,जिथे 50 मैदानांवर एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत.
  • यातील बहुतांश मैदानांवर भारतीय संघ खेळला आहे.

दिनविशेष:

  • सन 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली होती.
  • डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही सन 1849 मध्ये वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.
  • ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला होता.
  • उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म 23 जानेवारी 1915 मध्ये झाला.
  • हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचा जन्म 23 जानेवारी 1926 मध्ये झाला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.