23 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 जून 2019)
तिहेरी तलाकबंदी विधेयक पुन्हा लोकसभेत :
- तिहेरी तलाक बंदी विधेयक केंद्र सरकारने पुन्हा लोकसभेत मांडले. मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण असल्याचा युक्तिवाद केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.
- सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे.
- तसेच गेल्या लोकसभेत हे विधेयक संमत करण्यात आले होते. मात्र राज्यसभेत बहुमताअभावी सत्ताधाऱ्यांना ते मंजूर करून घेता आले नाही.
- तर 16वी लोकसभा विसर्जित झाल्यामुळे केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागला होता. पुढील आठवडय़ात या विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाईल.
‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीतूननाव वगळण्यात पाकिस्तान यशस्वी :
- फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) काळ्या यादीत नाव समाविष्ट होऊ नये यासाठी तुर्की, चीन आणि मलेशियाचा पाठिंबा मिळविण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला असल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे.
- तर पॅरिसमध्ये 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत एफएटीएफची परिषद होणार असून त्या वेळी पाकिस्तानला काळ्या यादीत समाविष्ट न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.
- तसेच जून 2018 मध्ये पॅरिसस्थित एफएटीएफने पाकिस्तानला ‘ग्रे‘ यादीत टाकले होते आणि त्यांना 27 कलमी कृती योजना दिली होती. त्या योजनेचा ऑक्टोबर 2018 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये आढावा घेण्यात आला. भारताने
पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांबाबतची माहिती दिल्यानंतर फेब्रुवारीत आढावा घेण्यात आला होता. - भारतासह अमेरिका आणि ब्रिटनने पाठिंबा दिलेल्या प्रस्तावाला तुर्कीनेच विरोध केला होता, तर पाकिस्तानचा सार्वकालीन मित्र देश असलेला चीन या वेळी गैरहजर होता. पाकिस्तान सध्या आर्थिक गर्तेत असून आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची याचना करीत आहे.
NSG गटात भारताच्या समावेशाला चीनचा विरोध कायम :
- आण्विक पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशास पुन्हा एकदा चीनने विरोध केला आहे. बिगर एनपीटी सदस्य देशांसाठी जो पर्यंत कुठली योजना तयार होत नाही तो पर्यंत एनएसजी गटामध्ये भारताच्या समावेशाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही असे चीनने स्पष्ट केले आहे. सदस्य देशांमध्ये कधीपर्यंत यावर तोडगा निघेल त्याबद्दलही चीनने कोणतीही मुदत देण्यास नकार दिला.
- तर भारताने मे 2016 मध्ये एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. तेव्हापासून चीन अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या देशांनाच सदस्यत्व देण्यासाठी आग्रही आहे.
- एनएसजी 48 देशांचा समूह असून हा गट आण्विक जागतिक व्यापाराचे नियंत्रण करतो.
- भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. पाकिस्ताननेही एनएसजी गटाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी 2016 मध्ये अर्ज केला आहे.
- तर 20 आणि 21 जूनला कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये एनएसजी गटाच्या सदस्य देशांची बैठक होणार आहे.
दिनविशेष :
- 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
- क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
- 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
- भारतीय क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
- भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा