23 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

आंतरराष्ट्रीय विधवा दिन
आंतरराष्ट्रीय विधवा दिन

23 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जून 2022)

तामिळनाडूतून विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध :

  • महाराष्ट्रातील पाच तरुण संशोधकांना तामिळनाडूतून नव्या विंचवाच्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे.
  • संशोधकात अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, स्वप्निल पवार, सत्पाल गंगलमाले आणि विवेक वाघे यांचा समावेश आहे.
  • नव्याने सापडलेली प्रजाती ही ‘हॉरमुरीडी’ कुळातल्या ‘चिरोमॅचेट्स’ या जातीमधील आहे.
  • ‘चिरोमॅचेट्स’ जात ही भारतीय द्विपल्कासाठी प्रदेशनिष्ठ असून त्यात आतापर्यंत पाच प्रजाती ज्ञात होत्या.
  • आता नव्याने शोध लागलेल्या प्रजातीमुळे ही संख्या सहावर गेली आहे.
  • पाचमधील तीन प्रजाती या महाराष्ट्र, केरळमध्ये एक आणि आंध्रप्रदेशात एक होत्या.
  • तमिळनाडूत ‘चिरोमॅचेटस’ या जातीची ही पहिलीच नोंद आहे.
  • अगस्त्यामलाई शिखराजवळ हा विंचू आढळून आला म्हणून त्याचे नामकरण ‘चिरोमॅचेट्स अगस्त्यामलाएनसीस’ असे करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2022)

प्रो लीग हॉकी भारताचा अमेरिकेवर विजय :

  • भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर 4-0 अशी मात करत पदार्पणाच्या हंगामातच तिसरे स्थान मिळवले.
  • भारताने पहिल्या लढतीत 4-2 असा विजय नोंदवला होता.
  • भारताकडून वंदना कटारियाने दोन गोल करत निर्णायक भूमिका पार पाडली.
  • अर्जेटिनाने यापूर्वीच लीगचे जेतेपद मिळवले आहे, तर नेदरलँड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
  • भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवत अमेरिकेला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

भारतीय खेळाडूसोबत लँकशायर क्लबने केला करार :

  • इंग्लंडमध्ये आजही पारंपरिक काऊंटी क्रिकेटला फार महत्त्व आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार अशी काऊंटीची ओळख आहे.
  • काऊंटी क्रिकेट खेळणे ही आजही खेळाडूंसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी देखील काऊंटी क्रिकेट खेळलेले आहे.
  • त्यामध्ये आता लवकरच वॉशिंग्टन सुंदरचेही नाव समाविष्ट होणार आहे.
  • लँकशायर क्रिकेट क्लबने आगामी 50 षटकांच्या चषकासाठी आणि काऊंटी चॅम्पियनशिपसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध करण्याची घोषणा केली आहे.
  • लँकशायरने आपल्या ट्विटर अकाऊंच्या माध्यमातून सुंदरला करारबद्ध केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
  • लँकशायर सध्या काऊंटी चॅम्पियनशिप विभागातील गुणतालिकेत सरे आणि हॅम्पशायरच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे.
  • व्हिटॅलिटी ब्लास्ट टी-20 सामन्यांनंतर ते 26 जूनपासून ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या लढतीसह रेड-बॉल क्रिकेट पुन्हा सुरू करतील.

दिनविशेष :

  • 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
  • क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
  • 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
  • भारतीय क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
  • भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.