23 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

आयफल टॉवर

23 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 मार्च 2022)

देशव्यापी ‘एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा मंच’ची स्थापना :

  • शेतकर्‍यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने त्वरीत कायदा करावा याकरिता देशव्यापी लढा उभा करण्यासाठी शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा या नावाने मंचची स्थापना केली आली आहे.
  • तर अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिली.
  • तसेच दिल्ली येथील नारायण दत्त तिवारी भवनमध्ये देशातील शेतकरी संघटनांची बैठक पार पडली.
  • केंद्र सरकारने तीन कृषि कायदे लागू केल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात लढा सुरू केला.
  • तर शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे नमते घेत केंद्र सरकारने तीन कृषि कायदे मागे घेतले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मार्च 2022)

आयफल टॉवरची उंची वाढवली :

  • पॅरीसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची उंची आता आणखी वाढली आहे.
  • 15 मार्च रोजी आयफेल टॉवरवर नवीन डिजिटल रेडिओ अँटेना बसवण्या आल्यानंतर त्याच्या उंचीमध्ये सहा मीटरची भर पडली आहे.
  • तंत्रज्ञ टॉवरच्या शीर्षस्थानी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अँटेना बसवत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
  • “दुर्मिळ आणि नेत्रदीपक तांत्रिक पराक्रम”ने आता टॉवरची उंची 324 मीटर वरून 330 मीटर केली आहे.
  • पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते.

लक्ष्य जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी :

  • ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक कमावणाऱ्या भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक बॅडमिंटन महासंघाने मंगळवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
  • तर त्याने दोन स्थानांनी सुधारणा करीत जागतिक क्रमवारीत नववे स्थान गाठले आहे.
  • उत्तराखंडचा 20 वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य हा ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पाचवा खेळाडू ठरला.
  • परंतु रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात डेन्मार्कचा जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील खेळाडू व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने त्याची विजयी घोडदौड रोखली.
  • ताज्या क्रमवारीत किंदम्बी श्रीकांतची 12व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
  • त्यामुळे सध्या लक्ष्य हा भारताचा पुरुष एकेरीतील सर्वोच्च क्रमांकावरील खेळाडू आहे.

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताचा बांगलादेशवर विजय :

  • यास्तिका भाटियाचे झुंजार अर्धशतक आणि स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी या बळावर भारताने मंगळवारी बांगलादेशवर 110 धावांनी वर्चस्वपूर्ण विजय मिळवला.
  • त्यामुळे ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारताच्या आशा टिकून आहेत.
  • नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली.
  • भारताने बांगलादेशला नमवून विश्वचषकातील तिसऱ्या विजयाची नोंद करताना निव्वळ धावगतीमध्येही 0.768 अशी वैशिष्टय़पूर्ण सुधारणा केली.
  • सहा सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण मिळवणारा भारतीय संघ गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष:

  • 23 मार्च हा दिवस ‘शहीद स्मृती दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1931 मध्ये सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचे पुण्यस्मरण.
  • 1956 यावर्षी पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
  • सन 1999 मध्ये पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण‘ सन्मानाने गौरविेण्यात आले.
  • क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना सन 1999 मध्ये ‘पद्मश्री‘ सन्मान प्रदान करण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मार्च 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago