23 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 मे 2019)
ओमानच्या जोखा अलहार्थी यांना प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार :
- ओमानच्या जोखा अलहार्थी या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या अरबी लेखिका ठरल्या आहेत.
- तर त्यांच्या ‘सेलेस्टियल बॉडीज’ या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला असून ओमान या त्यांच्या मूळ देशात वसाहतवादानंतर झालेली स्थित्यंतरे त्यांनी या पुस्तकात चितारली आहेत.
- तसेच अलहार्थी यांनी यापूर्वीही दोन लघु कादंबऱ्या, मुलांची पुस्तके व तीन अरबी कादंबऱ्या लिहिल्या आहेत.पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार असून तो लेखक व भाषांतरकार यांच्यात वाटला जातो.
- अलहार्थी यांच्या पुस्तकाचे भाषांतर अमेरिकी विद्वान मर्लिन बूथ यांनी केले असून त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात अरबी साहित्य शिकवतात.
घोडय़ावरून वैष्णोदेवी दर्शनास जाणाऱ्यांना शिरस्त्राण सक्ती :
- जम्मू काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिरात घोडी व खेचरांवरून जाणाऱ्या भक्तगणांना शिरस्त्राण (हेल्मेट), गुडघा व कोपर यांना संरक्षण देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- तसेच यात घोडी-खेचरांवरून जाणाऱ्यांना शिरस्त्राण सक्ती केली आहे. पायी जाणाऱ्यांनीही शिरस्त्राण वापरणे अपेक्षित आहे, पण सक्ती केलेली नाही.
- दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना अनेकदा अपघात होऊन ते जायबंदी होतात हे टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- माता वैष्णोदेवी मंदिर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमरणदीप सिंग यांनी ही योजना सादर केली आहे.
2018 मध्ये वैष्णोदेवीला 86 लाख भक्तगणांनी भेट दिली होती.
भावना कांत ठरल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक :
- फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत या हवाईदलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक झाल्या आहेत.
- 25 वर्षीय भावनानं मिग-21 बिसन्स विमानावरील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. भावना कांत बिहारमधील आहे.
- तर वायुसेनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार फायटर पायलटसाठी पाच वर्षांचे विनाअडथळा नियमित प्रशिक्षण आवश्यक आहे.
- मिग-21 विमान हवेत उडवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचं प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येतं. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असतं.
- भावना कांत हिने जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतलं आहे.
आता परदेशातही धावणार ‘मेड इन इंडिया ट्रेन’ :
- स्वदेशी बनावटीच्या असलेल्या Train 18 च्या कोचेसची आता अन्य देशांनाही विक्री करण्यात येणार आहे.
- दक्षिण आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देश या ट्रेनच्या खरेदीसाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे याबाबत एक योजना तयार करत असून या ट्रेनच्या कोचची देशातील मागणी पूर्ण झाल्यानंतरच अन्य देशांना कोचेस तयार करून देण्यात येतील.
- रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. सध्या इंटिग्रल कोट फॅक्टरीमध्ये 60 हजार कोचेस तयार करण्यात आले आहेत.
- Train 18 ही देशातील पहिली स्वयंचलित ट्रेन आहे. गेल्या वर्षीच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली होती. सध्या नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान ही ट्रेन चालवण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेत रूजू होण्यापूर्वी Train 18 चे नाव बदलून वंदे भारत एक्स्प्रेस करण्यात आले होते.
24 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विश्वविक्रम :
- जगातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.
- मात्र नेपाळमधील एका वाटसरुने चक्क 24 वेळा हे शिखर सर करण्याचा आगळावेगळा पराक्रम केला आहे. तर कामी
रिता शेर्पा यांनी मागील आठवड्यात 23 व्यांदा एव्हरेस्ट सर केल्यानंतर 21 मे 2019 पुन्हा एकदा हे शिखर सर केले. असा पराक्रम करणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. - तसेच मागील दोन दशकांहून अधिक काळापासून एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाट दाखवण्याचे काम करणाऱ्या रिता यांनी सर्वात आधी 1994 साली एव्हरेस्टचे 8 हजार 848 मीटर उंचीचे शिखर सर केले होते. त्यानंतर मागील 25 वर्षांमध्ये रिता यांनी 35 हून अधिक वेळा 8 हजार मीटरहून अधिक उंचीची शिखरे सर केली आहेत.
- 49 वर्षाच्या रिता यांनी यशस्वीरित्या सर केलेल्या शिखरांच्या यादीमध्ये पाकिस्तानमधील के टू या शिखराचाही समावेश आहे. के टू हे जगातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.
- तर मागील वर्षीच रिता यांनी 22 व्यांदा एव्हरेस्ट सर करत 21 वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम मोडीत काढला होता.
दिनविशेष :
- 23 मे 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून जिकाल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
- सिरील डेमियनला अकॉड्रीयनया या वाघाचे पेटंट 23 मे 1829 मध्ये मिळाले.
- पछिंम जर्मनी हे राष्ट्र 23 मे 1949 मध्ये अस्तित्वात आले.
- आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक 23 मे 1956 रोजी मंजूर झाले.
- बचेन्द्री पाल यांनी 23 मे 1984 रोजी दुपारी 1.09 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
- जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती सन 1995 मध्ये 23 मे रोजी प्रकाशीत केली गेली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा