Current Affairs (चालू घडामोडी)

24 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मुकेश अंबानी

24 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 एप्रिल 2020)

DRDO ने पंधरा दिवसात उभी केली दिवसाला हजार करोना टेस्ट करणारी प्रयोगशाळा :

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.
  • तर या लॅबमुळे Covid-19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
  • संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही MVRDL लॅब विकसित केली आहे. करोना व्हायरसविरोधात अनेक सरकारी संस्था आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. DRDO अशाच संस्थांपैकी एक आहे.
  • तसेच व्हेंटिलेटर, पीपीई किटसह करोनावर उपचारासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती डीआरडीओने केली आहे.
  • डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल 2 आणि 3 ही प्रयोगशाळा विक्रमी 15 दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात.
  • करोना व्हायरसच्या चाचणीचे दिवसाला 1 हजार नमुने तपासण्याची या लॅबची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही लॅब उभी करण्यात आली आहे असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 एप्रिल 2020)

मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती :

  • रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यात झालेल्या कराराचा फायदा रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना झाला आहे.
  • तर फेसबुकसोबत झालेल्या करारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • तसेच त्यांनी जॅक मा यांना पछाडत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार एका दिवसात त्यांच्या संपत्तीत 469 कोटी डॉलर्स म्हणजेच 34 हजार कोटी रूपयांची वाढ झाली आहे.

भारतातलं प्रदूषण 20 वर्षांतील नीचांकी पातळीवर :

  • करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत.
  • तर अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच सुरू आहेत. मोठे-मोठे कारखाने, उद्योगधंदे बंद आहेत.
  • तसेच बहुतांश लोक वर्क फ्रॉम होमचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे कार आणि इतर वाहनांमुळे होणारे प्रदुषणदेखील खूप कमी झाले आहे.
  • अशातच भारतासाठी एक अत्यंत चांगली बातमी आली आहे. भारतातील प्रदूषण हे 20 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर असल्याचे अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने अहवालात म्हटले आहे.
  • अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या उपग्रहाची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात, उत्तर भारतातील वायू प्रदूषण हे विविध वर्षांतील या कालावधीत प्रदुषणापेक्षा यंदाचे प्रदुषण हे 20 वर्षातील नीचांकी पातळीवर असल्याचे नमूद केले आहे.
  • करोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या उपग्रहाने सेन्सर्सच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात भारतात 20 वर्षातील सर्वात कमी एरोसोलची पातळी लॉकडाउननंतर आढळली.

वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना 10 लाखांच्या विम्याचं कवच :

  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. नागरिकांना या काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात आलेली आहे.
  • तर या काळात पोलिस, वैद्यकीय यंत्रणा जिवावर उदार होऊन काम करत आहेत. याचसोबत देशभरातील पत्रकारही या काळात वार्तांकनासाठी घराबाहेर पडतात.
  • मुंबईत काही टिव्ही पत्रकार व कॅमेरामनला करोनी लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्याच्या खडतर परिस्थितीत हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकारने सर्व पत्रकारांना 10 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुस्तकं मिळणार, पंखे दुकानं सुरु होणार, मोबाइल रिचार्जही करता येणार :

  • करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि आरोग्य सेवा जसं की दवाखाने, मेडिकल हे वगळण्यात आलं आहे.
  • आता केंद्र सरकारने आणखी थोडी सूट दिली आहे. ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सूट दिली आहे. तसंच पीठाच्या गिरण्या, ब्रेडचे कारखाने हे
    सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
  • त्याचप्रमाणे मोबाइल प्रीपेड रिचार्जची दुकानंही सुरु राहतील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्यांची दुकानंही सुरु राहतील. तसंच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरु राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

मराठी प्रकाशक संघाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना जाहीर :

  • जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणा-या जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांची, तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांची निवड करण्यात आली आहे.
  • अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली.
  • तर दरवर्षी जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून प्रकाशक संघातर्फे जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी उद्धवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वामुळे सध्या केवळ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भविष्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपल्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आणि प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने कळविले आहे.
  • तसेच आत्तापर्यंत जीवनगौरव पुरस्कराने पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, बेळगाव येथील नवसाहित्य प्रकाशनाचे जवळकर बंधू, अमरावती येथील नंदकिशोर बजाज, बॉम्बे बुक डेपोचे पां. ना. कुमठा, परचुरे प्रकाशन मंदिराचे आप्पा परचुरे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. तर, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आजपर्यंत द.मा.मिरासदार, निरंजन घाटे आदी साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे.

दिनविशेष:

  • 24 एप्रिल हा दिवस ‘भारतीय पंचायती राज दिन’ आहे.
  • सन 1800 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरुवात झाली.
  • जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू ‘सचिन तेंडुलकर’ यांचा जन्म 24 एप्रिल 1970 रोजी झाला.
  • रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म 24 एप्रिल 1896 मध्ये झाला होता.
  • सन 1990 मध्ये अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 एप्रिल 2020)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago