Current Affairs (चालू घडामोडी)

24 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2018)

प्लास्टीक जनजागृतीविषयक मोहीमेला आंतरराष्ट्रीय मोहोर:

  • भामला फाऊंडेशनच्या ‘प्लास्टीक जनजागृती’विषयक मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ‘जागतिक स्तरावरील प्लास्टीक जनजागृतीविषयक मोहिम‘ म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर या प्रभावी सांगितिक मोहिमेला आपल्या पर्यावरण विषयक मोहिमेतही सामील करून घेतले आहे.
  • जगभरातून या ‘टिक, टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे…’ गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या सांगितिक मोहिमेला याआधी राष्ट्रीय पुरस्कारानेही (नॅशनल ग्रीन अवॉर्ड) डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयार्क (अमेरिकेतील) येथील मुख्य कार्यालयात बोलावून भामला फाऊंडेशनला यावेळी सन्मानित करण्यात आले.
  • तसेच भारताच्या पर्यावरण खात्यानेही याच गाण्याला आपल्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेत सामील करून घेतले आहे. विविध राज्यांमध्ये आणि शाळांमध्ये ही सांगितिक मोहिम यशस्वी झाली आहे. या गाण्याला जगभरातील समाजिक संस्थांच्या उपस्थित न्यूयार्कमध्ये दाखवण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2018)

ड्रोन तंत्रज्ञान वापरात भारताची भरारी:

  • पारंपरिक देखरेखीच्या कामाच्या पलीकडे जाऊन भारतात स्वयंचलित हवाई यंत्रणेचा (ड्रोन) वापर रेल्वे, खाण उद्योग, मनोरंजनासह शेतीपर्यंत अनेक क्षेत्रात केला जात आहे.
  • परिणामी, भारतातील या क्षेत्राने भरारी घेतली असून, 2021 पर्यंत या क्षेत्राची भारतातील उलाढाल 6 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीनेक वर्षांत आपल्याला खासगी समारंभांपासून ते सार्वजनिक सोहळ्यांमध्ये अधिकाधिक ड्रोन पाहायला मिळणार आहेत.
  • बीआयएस रिसर्च या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अलीकडेच रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे मार्गाच्या देखभालीच्या दृष्टीने ड्रोन यंत्रणेचा वापर सुरू केला. त्याशिवाय गेल या कंपनीने पाइपलाइनवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा वापरली आहे.
  • पिकांचे आरोग्य आणि कीटकांच्या प्रादुर्भावाची माहिती घेण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाते. कर्नाटक सरकारनेही शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ड्रोनची मदत घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर, चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी ड्रोनचा वापर केला जातो. या पाश्र्वभूमीवर, या क्षेत्रात होणारी उलाढाल आणि त्यातून होणाऱ्या रोजगाराच्या संधी या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा आहे.
  • जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानाचा 2021 पर्यंत लष्करी वापरापेक्षा व्यावसायिक वापर वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उलाढालीवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
  • भारतात अनेक कंपन्या ड्रोन उत्पादन करत आहेत. तसेच एकाच वेळी अनेक कामे करू शकणाऱ्या ड्रोनची अधिक मागणी आहे. त्यामुळे ड्रोनच्या किमतीही किफायतशीर होत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

झुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती:

  • भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. झुलनने आतापर्यंत 68 टी-20, 168 वन-डे आणि 10 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
  • भारतीय संघाची सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून झुलन गोस्वामीची ओळख होती. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना झुलनने, बीसीसीआय व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत. महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात झुलनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे.
  • 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकातही झुलनने महत्वाची कामगिरी बजावली होती. 2007 साली झुलनने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कारही पटकावला होता. याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यासारखे मानाचे पुरस्कार झुलन गोस्वामीच्या खात्यात आहेत.

भारत व चीनचा लष्करी सहकार्यावर भर:

  • भारत व चीनमधील लष्करी सहकार्य व व्यूहरचनात्मक संबंध दृढ करण्याचा निर्धार 23 ऑगस्ट रोपजी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला.
  • भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले, तर चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंघे यांनी चीनचे नेतृत्व केले. “भारत-चीनमधील लष्करी सहकार्य आणि व्यूहरचनात्मक संबंध बळकट करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला,’ असे ट्विट सीतारामन यांनी केले.
  • गेल्या सहा वर्षांत भारताला भेट देणारे जनरल वी हे चीनचे पहिले संरक्षण मंत्री आहेत. 2017 मधील डोकलाम वादानंतरची चिनी लष्करी अधिकाऱ्यांची ही पहिली उच्चस्तरिय बैठक होती.
  • जनरल वी हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून 21 ऑगस्ट रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. चिनी प्रसारमाध्यमांनाही या उच्चस्तरिय बैठकीचे स्वागत केले आहे.

माहिती उघड करण्यास व्हॉट्सअ‍ॅपचा नकार:

  • व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचे मूळ शोधणारी यंत्रणा विकसित करण्याची भारताची सूचना व्हॉट्सअ‍ॅपने धुडकावली आहे. यामुळे आमच्या वापरकर्त्यांच्या खासगीपणाच्या हक्कांचे उल्लंघन होईल, असे कारण व्हॉट्सअ‍ॅपने दिले आहे. हे माध्यम व्यक्ती-व्यक्तींमधील खासगी संवादाचे माध्यम आहे. त्यामुळे कुणाच्याही संदेशाचा माग घेऊन तो उघड करणे हा त्यांच्या गोपनीयतेचा भंग आहे. या माध्यमातून अपप्रचार होऊ नये, ही भूमिका रास्त आहे. पण त्यासाठी लोकप्रबोधन हाच उपाय आहे, असे व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले.
  • माहितीचे गुगल ड्राइव्हवरील जतन बंद-
  • व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलमधील नवीन करारानुसार व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती 12 नोव्हेंबरनंतर आपोआप गुगल ड्राइव्हमध्ये जतन होणार नाही. आता आपले संवाद, संदेश, छायाचित्रे, चित्रफिती आदी माहिती 30 ऑक्टोबपर्यंत जतन करावी लागेल, अन्यथा ती नष्ट होईल. 12 नोव्हेंबरनंतरही व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती गुगल ड्राइव्हला जतन करायची असेल, तर ती स्वत:ला (मॅन्युअली) करावी लागणार आहे.
  • वापरकर्त्यांने स्वत: बॅकअप न घेतल्यास तो ड्राइव्ह मध्ये दिसणार नसल्याचे व्हॉटसअ‍ॅपकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळ गुगल ड्राइव्हवरील ताण कमी होणार आहे. माहिती जतनासाठी गुगलच्या सहकार्याने व्हॉट्सअ‍ॅप स्वतंत्र प्रणाली उभारणार आहे. ज्यात गुगल ड्राइव्हच्या पंधरा जीबी व्यतिरिक्त ही साठवण्याची क्षमता असणार आहे.

दिनविशेष:

  • 24 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन‘ आहे.
  • सन 1690 मध्ये 24 ऑगस्ट रोजी कोलकाता शहराची स्थापना झाली.
  • सन 1875 मध्ये कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
  • स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
  • विक्रमवीर भारतीय जलतरणपटूमिहिर सेन‘ यांनी सन 1966 मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
  • सन 1995 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago