Current Affairs (चालू घडामोडी)

24 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2018)

आता पीएफ कार्यालयाचा कारभार ऑनलाइन:

  • सातपूर‘ जिल्हा नाशिक हे देशातील सर्वात जास्त निवृत्ती वेतनधारक व पीएफ खातेदार म्हणून नावलौकीक असलेल्या येथील पीएफ कार्यालयाने आपला संपूर्ण कारभार हा ऑनलाईन केला असून, देशात असे कामकाज करणारे हे पहिले कार्यालय ठरले असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
  • भविष्य निर्वाहनिधीचे (पीएफ) आयुक्त एम.एम. आशरफ यांनी ही माहिती दिली. नाशिक विभागातील खातेदारांचे केवायसी पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे.
  • 31 डिसेंबरअखेर ते पूर्ण करण्याची मुदत आहे. दरम्यान, ऑनलाईन कामकाजामुळे खातेदाराला स्वत:चे पैसे काढण्यासाठी मालक व व्यवस्थापक यांच्या सही शिक्‍याची गरज नाही. तसेच क्‍लेम सेटलमेंट काही तासांतच होत आहे.

रेयाल माद्रिदची पुन्हा क्लब विश्वचषकाला गवसणी:

  • प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेल्या रेयाल माद्रिदने अल अैन संघाला 4-1 अशी पराभूत करून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे झालेल्या क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यंदाच्या चॅम्पियन्स लीगच्या विजेत्या रेयालचे हे सलग चौथे क्लब विजेतेपद ठरले.
  • रेयालसाठी लुका मॉड्रिचने 14व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर मार्कोस लॉरेंटने 60व्या आणि सर्गियो रामोसने 78व्या मिनिटाला अनुक्रमे दुसरा व तिसरा गोल नोंदवला.
  • 86व्या मिनिटाला त्सुआका शितोनीने अल अैन संघासाठी एकमेव गोल केला. 92व्या मिनिटाला नादेर मुस्तफाने चुकीने स्वयंगोल करत रेयालच्या खात्यात चौथ्या गोल जमा केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2018)

बाला रफिक शेखला महाराष्ट्र केसरीचा किताब:

  • गुणांच्या जोरावर बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. 11-3 अशा गुणाने त्याने अभिजितला पराभूत केले.
  • लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.
  • बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते.
  • तसेच बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे 65 वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.

देशभरातील अव्वल 10 पोलीस स्थानके:

  • देशभरातील पहिल्या दहा पोलीस स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. 2018 या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकांमध्ये राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशनने अव्वल स्थान पटकावले आहे.
  • गृह मंत्रालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या या देशभरातील दहा पोलीस स्थानकांचा गौरव करण्यात आला. स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत ही मानंकने निवडण्यात आली आहे.
  • पोलीस स्टेशनची यादी पुढीलप्रमाणे :
    कालू (बिकानेर, राजस्थान), कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार), फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल), नेत्तापक्कम (पुदुच्चेरी), गुदेरी (कर्नाटक), चोपाल (हिमाचल प्रदेश), लाखेरी (राजस्थान), पेरियाकुलम (तामिळनाडू), मुन्स्यारी (उत्तराखंड) आणि कुडचरे (गोवा).

टीव्ही, संगणक आणि टायर यांच्यावरच्या जीएसटीत कपात:

  • टीव्ही, संगणक, टायर, 100 रुपयांवरील सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. हा जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली.
  • अलीकडेच जीएसटी परिषदेची 31 वी बैठक पार पडली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जीएसटी परिषदेची 31 वी बैठक पार पडली. या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली. दोन समित्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली असेही जेटली यांनी म्हटले आहे.
  • 28 टक्के कर असलेल्या 28 च वस्तू त्या टॅक्स स्लॅबमध्ये उरल्या आहेत असेही अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. सिमेंट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ही जीएसटीची कपात करण्यात आली आहे.
  • ऑटोमोबाइल सेक्टरमधल्या 13 वस्तूंवरचा कर हा 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर सिमेंटवरचा करही 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे असेही जेटली यांनी म्हटले आहे.
  • तर ज्या वस्तूंवरचा कर 28 टक्क्यावरून 18 टक्के करण्यात आला त्या वस्तूंवर 1 जानेवारी 2019 पासून 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असेही जेटली यांनी म्हटले आहे.
  • एकूण 33 वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले आहे. 26 वस्तूंवरचा जीएसटी 12 ते 5 टक्के असा करण्यात आला आहे. तर बाकी सहा वस्तूंवरचा जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

दिनविशेष:

  • सन 1777 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
  • स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 मध्ये झाला होता.
  • बालसाहित्यक, समाजवादी नेते, समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यसैनिकपाडुरंग सदाशिव सानेउर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर सन 1899 रोजी झाला होता.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 24 डिसेंबर सन 1910 रोजी जन्मठेपेचीकाळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago