24 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
24 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 डिसेंबर 2020)
रशियात पुतीन सरकारचा नवा कायदा :
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे.
- तर या नवीन कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा त्याग केल्यानंतरही राष्ट्रध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीविरोधात कोणत्याच प्रकारचा कायदेशीर खटला दाखल करता येणार नाही. म्हणजेच एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला कायदेशीर खटल्यांपासून मरेपर्यंत संरक्षण मिळणार आहे.
- तसेच या कायद्यासंदर्भातील माहिती मंगळवारी ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली. या कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी या कालावमध्ये केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यात आलं आहे.
- तर या व्यक्तींविरोधात या नवीन कायद्यानुसार कोणताही न्यायालयीन खटला चालवता येणार नाही. केवल खटल्यापासून मुक्ती नाही तर माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा हक्क पोलीस किंवा इतर तपास यंत्रणांना असणार नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.
Must Read (नक्की वाचा):
निहाल, रक्षिता, गुकेश यांना सुवर्णपदके :
- भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरिन, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि डी. गुकेश यांनी फिडे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.
- निहाल याने अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान याचा 18 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत 1.5-0.5 असा पराभव केला.
- तर रक्षिताने मुलींच्या 16 वर्षांखालील गटात चीनच्या साँग युक्सिन हिच्यावर 1.5-0.5 अशी सरशी साधली.
- गुकेशने मुलांच्या 14 वर्षांखालील गटात वोलोडार मुरझिन याचा 2-1 असा पाडाव करत जेतेपद पटकावले.
महेश एलकुंचवार, गजानन खातू यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा जीवनगौरव :
- ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांना अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशनच्या दिलीप वि. चित्रे स्मृती-साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
- तर फाउंडेशनचा समाजकार्यातील जीवनगौरव पुरस्कार गजानन खातू यांना जाहीर झाला आहे.
- ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना विशेष कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
- तर दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे, तर एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह प्रत्येकी असे कृतज्ञता आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराचे स्वरूप आहे.
- साहित्यामध्ये सुबोध जावडेकर यांना ‘विज्ञानकथा’ या साहित्य प्रकारासाठी, किरण येले यांना ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहासाठी ग्रंथ पुरस्कार (ललित), प्रदीप पुरंदरे यांना ‘पाण्याशप्पथ’ या ग्रंथासाठी वैचारिक अपारंपरिक/ग्रंथ पुरस्कार, श्याम पेठकर यांना ‘तेरवं’ नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार दिला जाईल.
- समाजकार्यामध्ये अरुणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार, सुधाकर अनवले यांना कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार, चेतन साळवे यांना युवा पुरस्कार दिले जाणार आहेत.
दिनविशेष:
- सन 1777 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
- स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 मध्ये झाला होता.
- बालसाहित्यक, समाजवादी नेते, समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यसैनिक ‘पाडुरंग सदाशिव साने‘ उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर सन 1899 रोजी झाला होता.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 24 डिसेंबर सन 1910 रोजी जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.