24 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 फेब्रुवरी 2020)
अमेरिकेत वास्तव्यासाठी अडसर ठरणारा नियम आजपासून लागू :
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात येत असतानाच अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड मिळण्यात अनेक अडचणी निर्माण करणारा नियम लागू करण्यात येत आहे.
- तर यामुळे एच 1 बी व्हिसाधारकांना अडचणी येणार आहेत. या प्रकारचा व्हिसा असलेल्या नागरिकांत भारत व चीनच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्या लोकांनी अन्न कूपनांसह सार्वजनिक आर्थिक लाभाच्या योजनांचा फायदा घेतला आहे त्यांना ग्रीनकार्ड देण्यात येणार नाही, असे सूचित होत आहे.
- स्थायी निवास सुविधा म्हणजे ग्रीन कार्ड मागणाऱ्या व्यक्तींना त्यांनी अमेरिकेत आल्यानंतर आर्थिक लाभांच्या योजनांचा फायदा घेतलेला नाही हे सिद्ध करावे लागेल.
- तसेच स्थलांतर धोरण संस्था अहवाल 2018 अनुसार बांगलादेशातील 61 टक्के, पाकिस्तानातील 48 टक्के, भारतातील 11 टक्के कुटुंबांनी आर्थिक लाभांच्या योजनांचा फायदा घेतला होता त्यांची तपासणी केली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्याचा विचार :
- तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा सरकार विचार करीत आहे.
- तसेच सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिक भक्कम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तंबाखू नियंत्रणासाठी कायद्यात काय दुरुस्ती कराव्यात, याबाबत शिफारस करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक कायदा उपसमिती नेमली होती. या समितीने शिफारशींसह आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सादर केला आहे.
- तर तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्यासोबत नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढविण्याची शिफारस या समितीने केली आहे.
- यासोबतच सिगारेट आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापारावर निगराणीची आणि त्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचे समितीने सुचविले आहे.
- जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार (जीएटीएस-2) तंबाखू सेवनाचे सुरुवातीचे सरकारी वय 17.9 वर्षांवून 18.9 वर्षे करण्यात आले आहे.
न्यूझीलंडच्या कर्णधाराचा विश्वविक्रम :
- ICC Womens T20 World Cup स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या महिला संघानं 7 विकेट्स राखून श्रीलंकेच्या महिला संघावर विजय मिळवला.
- श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 128 धावांचं लक्ष्य न्यूझीलडनं 17.4 षटकांत 3 बाद 131 धावा करून पार केले.
- तर या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईननं नाबाद 75 धावा करताना विश्वविक्रमाला गवसणी घातली.
तसेच आतापर्यंत पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूला असा विक्रम करता आलेला नाही.
विराट कोहलीने मोडला सौरव गांगुलीचा विक्रम :
- यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
- भारताच्या 165 धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा करताना 183 धावांची निर्णायक आघाडी घेतली. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ (14) पुन्हा एकदा अपयशी ठरला.
- पण, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सावरले. पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनं 11वी धाव घेताच विक्रमाला गवसणी घातली. त्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला.
आशियाई कुस्ती स्पर्धात राहुल आवारेला कांस्यपदक :
- महाराष्ट्राला यंदाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील पहिले पदक राहुल आवारेच्या रूपाने मिळाले.
- 61 किलो वजनी गटात राहुलने कांस्यपदकाची कमाई करत आपल्या खात्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय पदकाची भर घातली.
- स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी मात्र भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 74 किलो वजनी गटात सुशील कुमारचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा जितेंदर कुमार याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धात विजयासह भरत सुब्रह्मण्यम अव्वल स्थानी :
- भारताचा युवा खेळाडू भरत सुब्रह्मण्यम याने एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेत चीनचा ग्रँडमास्टर जिआन्चो झू याला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच स्पर्धेत ‘अ’ गटातून सुब्रह्मण्यम याने संयुक्तरीत्या अव्वल स्थान मिळवले.
- आंतरराष्ट्रीय मास्टर सुब्रह्मण्यम याने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना 74 चालींपर्यंत रंगलेल्या लढतीत झू याचा पराभव केला. सुब्रह्मण्यम याचा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला.
दिनविशेष :
- 24 फेब्रुवारी 1670 मध्ये राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
- जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे 24 फेब्रुवारी 1822 मध्ये उद्घाटन झाले.
- इस्टोनिया देशाला 24 फेब्रुवारी 1918 मध्ये रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
- 24 फेब्रुवारी 1920 मध्ये नाझी पार्टीची स्थापना झाली.
- व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण 24 फेब्रुवारी 1942 मध्ये सुरू झाले.
- कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात 24 फेब्रुवारी 1952 मध्ये झाली.
- 24 फेब्रुवारी 1961 मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा