24 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 जानेवारी 2019)
पासपोर्टमध्ये होणार मोठा बदल:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे सरकार लवकरच चिप असलेले ई-पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली.
- आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडून परवानगी मिळाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट जारी करण्याची तयारी सुरू केली आहे.
- नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस (ISP), येथे हे पासपोर्ट बनवले जातील. ISP ला यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे.
- आयएसपी, आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) या प्रणालीवर संयुक्तपणे काम करत आहे. तर यासाठी आयआयटी कानपूर आणि एनआयसीने एकत्र येत एक सॉफ्टवेअर बनवले आहे.
- ई-पासपोर्टची वैशिष्ट्य-
- ई-पासपोर्टच्या पुढील आणि मागील बाजूचे आवरण जाड असेल.
- मागील आवरणावर छोटी सिलीकॉन चिप असेल. ही चिप पोस्ट स्टॅम्पपेक्षाही छोटी असेल.
- चिपमधील माहिती वाचण्यासाठी केवळ काही सेकंदाचा वेळ लागेल. यामुळे इमिग्रेशन काउंटर्सवर वेळ वाचेल.
- 64 किलोबाइट इतकी या चिपची मेमरी असेल. यामध्ये 30 व्हिजीट केलेल्या अथवा आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती सेव्ह होईल.
- चिपमध्ये फोटो आणि बोटांचे ठसे देखील सेव्ह केले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- अमेरिकेच्या सरकारी प्रयोगशाळेत याची सर्वप्रथम चाचणी घेण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
तब्बल 50 देशांत प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट:
- अभिनेत्री कंगना रणौत हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी‘ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे.
- भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
- आनंदाची बाब म्हणजे फक्त भारतच नाही तर जगभरातील तब्बल 50 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
- येत्या 25 जानेवारीला ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
- जगभरातील 50 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली आहे.
- झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत आहे.
प्रियंका गांधी यांची काँग्रेसमध्ये महासचिवपदी नियुक्ती:
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठी खेळी खेळली असून प्रियंका गांधी यांची पक्षात महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते. आता प्रियंका गांधी यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
- प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.
- सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षात पद दिले आहे.
- प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
तुंगारेश्वरच्या पर्यटन विकासाला चालना:
- वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पालघर जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
- वसईच्या पूर्व भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे. येथे तुंगारेश्वर देवस्थानही आहे. 2002 मध्ये या परिसराला पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र मान्यता मिळूनही पर्यटन विकास झाला नव्हता.
- 17 वर्षे उलटल्यानंतरही प्रशासनाने विकासकामांना सुरुवात न केल्याने येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना अनेक सुविधांची कमतरता भासत होती.
- पुरातनकालीन महादेव मंदिर, बालयोगी सदानंद महाराज आश्रम यांमुळे येथे हजारो भाविक येत असतात. त्याशिवाय विपुल निसर्गसौंदर्य लाभल्याने पर्यटकांचाही नेहमी वावर असतो.
- पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही प्रशासनाने याकडे पाठ फिरवल्याने तुंगारेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आणि अन्य विश्वस्तांनी मुख्यमंत्री, वनमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. पालघर जिल्हा नियोजन समितीकडेही या कामांचा पाठपुरावा करण्यात आला.
रेल्वे खात्यात होणार मेगाभरती; रेल्वेमंत्र्यांची घोषणा:
- भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
- भारतीय रेल्वेत सध्या एक लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून, येत्या दोन वर्षांत एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे 2 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
- तसेच सी आणि डी या दोन गटातील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व जागा मिळून येत्या दोन वर्षांत रेल्वेत सुमारे 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
दिनविशेष:
- सन 1857 मध्ये दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
- एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान 24 जानेवारी सन 1966 मध्ये युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले होते.
- सन 1976 मध्ये ‘बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे 1 ऑगस्ट 1977 रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.
- सन 1984 मध्ये कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा