24 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 जुलै 2018)
‘आयआरटीसी’कडून सुधारित शुल्क जाहीर :
- पेटीएम किंवा तत्सम गेटवेव्दारे रेल्वेचे आरक्षण केल्यास आता प्रतितिकीट 12 रुपये आणि कर प्रवाशांना अतिरिक्त द्यावा लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या ‘इंडियन रेल्वे केटरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड‘ने याबाबत माहिती नुकतीच जाहीर केली आहे.
- तसेच काही राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन आरक्षण केल्यास प्रतिव्यवहाराला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, काही बॅंकांना अतिरिक्त शुल्कातून वगळले आहे.
- रेल्वेचे आरक्षण ऑनलाइन करण्याचे प्रमाण वाढत आहे. पेटीएम किंवा मेक माय ट्रीप डॉट कॉम, यात्रा आदी ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयआरटीसी‘ने सुधारित शुल्क जाहीर केले आहे.
- त्यानुसार खासगी कंपन्यांच्या गेटवेव्दारे आरक्षण केल्यास प्रतीतिकिट 12 रुपये, तर राष्ट्रीयकृत बॅंकांच्या डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास प्रती व्यवहार दहा रुपये शुल्क आणि त्यावर कर आकारण्यात येईल. नेट बॅंकिंगव्दारेही व्यवहार केल्यास प्रतिव्यवहार दहा रुपये शुल्क असेल, असे ‘आयआरटीसी’ने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
सचिन तेंडुलकर करणार रेल्वे प्रवाशांत जागृती :
- पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडण्यातील धोके, महिला प्रवासी सुरक्षा व स्वच्छता या गंभीर मुद्द्यांवर विशेष जागरूकता अभियान राबवले आहे. याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर पश्चिम रेल्वेच्या मदतीला धावला आहे.
- पश्चिम रेल्वेने अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून नुकतेच सेलिब्रिटींच्या मदतीने प्रवासी जागरूक अभियान सुरू केले आहे. यात सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ, जॉन अब्राहम आणि अन्य अभिनेत्यांचे व्हिडीओ पोस्ट करण्यात येणार आहेत.
- तसेच यापाठोपाठ सचिनलाही या अभियानात सहभागी करून घेतले आहे. लवकरच त्याचे ऑडिओ-व्हिडीओ एलसीडी व एलईडी स्क्रीनवर दाखवले जातील. टीव्ही चॅनेल, चित्रपटगृह, एफएम, रेडिओच्या माध्यमातूनही ते लोकांपर्यंत पोहचवण्यात येतील. काही अभिनेत्रींचाही उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना दिली.
महिनाभर नोकरीत नसलेल्या व्यक्तीला पीएफ काढता येणार :
- किमान एक महिनाभर नोकरीत नसलेल्या व्यक्तीला भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) 75 टक्के रक्कम काढता येईल, असे कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत सांगितले.
- ते म्हणाले, की कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची 222वी बैठक 26 जून रोजी झाली, त्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना परिच्छेद 68 एचएच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सतत एक महिना कुठल्याही नोकरीत नसलेल्या व्यक्तीला त्याच्या नावावर असलेल्या निधीपैकी 75 टक्के पैसे काढता येतील.
- तसेच जर एखादी व्यक्ती संबंधित संस्थेत दोन महिने नोकरीत नसेल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 नुसार तिला भविष्य निर्वाह निधीची सगळी रक्कम काढता येईल. ज्या दिवशी ती व्यक्ती निधीसाठी अर्ज करेल त्यानंतर लगेचच ही रक्कम दिली जाईल.
- विवाहाच्या कारणास्तव राजीनामा देणाऱ्या महिलांना पैसे परत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आता राहणार नाही. त्यांना नोकरी सोडल्यानंतर लगेचच अर्ज क रून भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळवता येतील.
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजूर :
- राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मागार्चा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून या मागार्मुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या व विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागार्बाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19 च्या योजनात नव्या रेल्वेमागार्चा समावेश करण्यात आला आहे.
- सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मागार्मुळे उस्मानाबादच्या जनतेसाठी प्रवास सोयीस्कर होणार असून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
- तसेच, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर व उस्मानाबादहून येणाऱ्या भाविकांचीही मोठी सोय होणार आहे.
27 जुलै रोजी पाहता येणार लाल चंद्राची अनुभूती :
- चालू शतकातील सर्वात जास्त कालावधीचे चंद्रग्रहण (103 मिनिटे) 27 जुलैच्या रात्री होणार असून ते 28 जुलैच्या पहाटेपर्यंत चालणार आहे. यात चंद्र लालसर दिसणार असून त्याला ‘ब्लड मून’ असे म्हणतात. हे चंद्रग्रहण पाहण्याची संधी भारतातील खगोल निरीक्षकांना मिळणार आहे.
- दिल्ली, पुणे, मुंबई यासह अनेक शहरांतून हे चंद्रग्रहण दिसणार आहे. असे असले तरी ढगाळ वातावरणामुळे खगोल निरीक्षकांचा हिरमोड होऊ शकतो. खग्रास अवस्थेत चंद्रबिंब पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येऊन झाकले जाईल. पहाटे 2.43 पर्यंत ही अवस्था राहील. नंतर चंद्र हळूहळू पृथ्वीच्या छायेतून बाहेर निघण्यास सुरुवात होईल. हे चंद्रग्रहण 103 मिनिटे चालणार असून ते शतकातील सर्वात जास्त कालावधीचे चंद्रग्रहण आहे.
- पृथ्वीच्या छायेतून निघताना चंद्र पुन्हा खंडग्रास अवस्थेत दिसेल. ही अवस्था पहाटे 3.49 वाजता पाहायला मिळेल. नंतर 4.58 वाजता हे ग्रहण संपेल. चंद्रग्रहण पाहण्यासाठी आकाश निरभ्र असणे आवश्यक आहे.
- आठ इंची किंवा त्यापेक्षा जास्त इंचाच्या दुर्बिणीतून ते पाहता येईल. नुसत्या डोळ्यांनीही चंद्रग्रहण पाहणे सुरक्षित आहे. त्यासाठी फिल्टर वापरण्याची गरज नाही.
दिनविशेष :
- 24 जुलै 1998 मध्ये परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
- विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची ‘विजयालक्ष्मी सुब्रमण्यम’ भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली.
- हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म 24 जुलै 1911 मध्ये झाला.
- सन 1997 मध्ये माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा